अमिताभ नाही रेखाचं होतं या विवाहित अभिनेत्यावर प्रचंड प्रेम; अभिनेत्याच्या पत्नीने हॉटेलमध्ये पकडलं होतं रंगेहाथ
Tv9 Marathi July 07, 2025 11:45 PM

अनेकदा चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान अनेक स्टार्स एकमेकांच्या जवळ येतात. प्रेमात पडतात. काही जणांचे नाते हे लग्नापर्यंत जातं तर काहीजणांचे नाते काही कारणास्तव मध्येच तुटते. काही वेळेला तर अभिनेते आणि अभिनेत्री विवाहित कलाकारांच्या प्रेमात पडतात. त्यांचे लग्न झाले आहे याचीही पर्वा यापुढे नसते. या सेलिब्रिटींमध्ये रेखाचे नाव हे असतेच. रेखा यांचे नाव हे अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहेत. पण अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त रेखा यांचे नाव इतर अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते.

रेखाचे या विवाहित अभिनेत्यावर होते प्रचंड प्रेम 

असाही एक अभिनेता होता ज्याच्यावर रेखा यांचे प्रचंड प्रेम होते.तो अभिनेता तेव्हा विवाहित होता. मात्र दोघांच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र पसरल्या होत्या. त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या अफवा इतक्या पसरल्या होत्या की असेही म्हटले जात होते की सुपरस्टारच्या पत्नीने अभिनेत्याला रंगेहाथ पकडले होते.

हा अभिनेता म्हणजे कमल हसन. या अभिनेत्याच्या आयुष्याची खूप चर्चा झाली होती. लग्न, घटस्फोट आणि लिव्ह-इन रिलेशनशिपचीही चर्चा झाली. कमल हसन यांचे नाव रेखाशी जोडले गेले. दोघांनी एका चित्रपटात एकत्र काम केल्यावर त्यांच्या अफेअरच्या बातम्या वेगाने पसरत होत्या. हे सर्व घडले जेव्हा रेखा यश चोप्रांच्या सिलसिला चित्रपटात काम करत होती. सिलसिला व्यतिरिक्त, रेखाने कमल हसन आणि श्रीदेवी यांच्यासोबत असलेल्या मींदम कोकिला हा तमिळ चित्रपट देखील साइन केला होता. ही गोष्ट आहे 1981. वृत्तानुसार, चित्रपटादरम्यान त्यांचे नाते अधिक घट्ट झाले आणि ते एकमेकांच्या खूप जवळ आले.

रेखासोबतच्या अफेअरची बातमी अभिनेत्याच्या पत्नीपर्यंत पोहोचली

कमल हसन आणि रेखा यांच्या जवळीकतेची बातमी अभिनेत्याच्या घरी पोहोचली. त्यावेळी कमल हसन विवाहित होते. त्यांचे लग्न 1978 मध्ये वाणी गणपतीशी झाले होते. दोघांमधील दुरावा इतका वाढला की ते 1988 मध्ये वेगळे झाले. कमल हसन आणि रेखा यांच्या नात्याची बातमी वाणी गणपतीपर्यंतही पोहोचली. असे म्हटले जाते की वाणीने रेखा आणि कमल हसन यांना एका हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले होते.

रेखा आणि अभिनेत्याला त्याच्या पत्निने हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं

एका वृत्तानुसार, 1979 मध्ये, चेन्नईतील चोला शेरेटन हॉटेलमध्ये एक पत्रकार काही कामासाठी तिथे गेले होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की ती जागा खूप गर्दीने भरलेली होती. मग रिसेप्शनवर काम करणाऱ्या मुलीने त्याला सांगितलं की कमल हसन आणि रेखा हॉटेलमधील एका खोलीत आहेत. त्यानंतर अभिनेत्याची पत्नी वाणी गणपती तिथे पोहोचली. तिथे पोहोचल्यानंतर ती दोघांवर खूप रागावली आहे आणि वाद सुरु आहे.

या गोंधळानंतर, रेखाला त्या प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आल्याच्या चर्चा 

या गोंधळानंतर, रेखाला त्या प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आल्याच्या अफवाही पसरल्या. तिच्या जागी मल्याळम अभिनेत्री दीपा (उन्नी मेरी) ला घेण्यात आलं. आजपर्यंत कमल हसन आणि रेखा यांनी या घटनेवर कधीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशा परिस्थितीत, या घटनेची कुठेही पुष्टी झालेली नाही.कमल हसन आणि वाणी गणपती यांचे लग्नही टिकले नाही. त्यानंतर अभिनेता सेटवर सारिकाच्या प्रेमात पडला. असे म्हटले जाते की सारिका लग्नापूर्वीच गर्भवती राहिली होती. नंतर घाईघाईत त्याने 1988 मध्ये वाणीला घटस्फोट दिला आणि त्याच वर्षी सारिकाशी लग्न केले. या लग्नापासून त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत. तथापि, सारिका आणि कमल यांचे लग्नही टिकले नाही आणि 2004 मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.