धोनीने जानेवारी 2017 साली एकदिवसीय कर्णधारपदाचा राजनीमा दिला होता. धोनीने तोवर 199 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं होतं. त्यानंतर 696 दिवसांनी रोहितमुळे धोनीला कर्णधार म्हणून 200 व्या सामन्यात कर्णधार म्हणून खेळण्याची संधी मिळाली होती. (Photo Credit : Icc X Account)
धोनीने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला 2007 सालचा टी 20I वर्ल्ड कप, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 अशा एकूण 3 आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या. धोनीने भारताचं 90 कसोटी, 350 वनडे आणि 98 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. धोनीने या तिन्ही फॉर्मटेमध्ये अनुक्रमे 4 हजार 876, 10 हजार 773 आणि 1 हजार 617 धावा केल्या. (Photo Credit : PTI)
महेंद्रसिंह धोनी याने भारताचं 332 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. धोनीने 60 कसोटी, 72 टी 20i आणि 200 एकदिवसीय सामन्यांत कर्णधार म्हणून जबाबदारी पाहिली. मात्र धोनीला रोहितमुळे 200 व्या एकदिवसीय सामन्यात नेतृत्व करण्याची संधी मिळाली. (Photo Credit : Icc X Account)
रोहितने आशिया कप 2018 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत विश्रांतीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे धोनीने त्या सामन्यात नेतृत्व केलं होतं. धोनीचा कर्णधार म्हणून तो 200 वा एकदिवसीय सामना होता. (Photo Credit : PTI)
धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. धोनी आता आयपीएल स्पर्धेत खेळतो. धोनीने त्याच्या नेतृत्वात चेन्नईला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. (Photo Credit : PTI)
धोनीने त्याच्या नेतृत्वात भारताला कसोटीतील 60 पैकी 27 सामन्यांमध्ये विजयी केलं. तर 18 वेळा पराभूत व्हावं लागलं. तसेच टी 20i मध्ये 42 वेळा भारताचा विजय झाला. तर प्रतिस्पर्धी संघांनी 28 वेळा भारतावर मात केली. तसेच धोनीने 200 एकदिवसीय पैकी 110 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. तर 74 वेळा भारताचा पराभव झाला. मात्र रोहितने एक तसा निर्णय घेतला नसता तर धोनीला 200 व्या सामन्यात नेतृत्व करण्याची संधी मिळाली नसती. (Photo Credit : Icc X Account)