अमरनाथ यात्रेला जाऊ शकत नाही तर काही टेन्शन नाही…चला छोटा अमरनाथ, कोठे आहे शिवधाम?
Tv9 Marathi July 07, 2025 11:45 PM

जर तुम्ही काही कारणांनी अमरनाथ यात्रेला नाही जाऊ शकत तर निराश होण्याची काही गरज नाही. मध्य प्रदेशातील खरगोन आणि इंदूर जिल्ह्याच्या सीमेवर विंध्याचल पर्वताच्या कुशीत एक गुहा असून तिला छोटा अमरनाथ म्हटले जाते. येथे भगवान शिव शंकर शिवलिंगाच्या रुपात विराजमान आहेत. हे स्थान ‘महादेव खोदरा’ नावाने देखील प्रसिद्ध आहे. दाट जंगलात, उंच डोंगर आणि वाहत्या धबधब्याच्या मध्ये असलेले ‘शिवधाम’ केवळ भक्तांच्या आस्थेचे केंद्र नसून निसर्ग प्रेमी आणि एडव्हेंचरची आवड असणाऱ्यांचेही आवडते ठिकाण आहे. येथे दर्शन घेतल्याने अमरनाथ यात्रेचे पुण्य मिळते असे भक्तांची श्रद्धा आहे.

मान्सून दरम्यान येथील नजारा आणखीनच मनमोहक होऊन जातो. संपूर्ण क्षेत्र हिरवाईने भरुन जाते आणि अनेक छोटे-मोठे धबधबे लागतात. गुहेच्या जवळ देखील एक झरा असून तो सतत वाहत असतो. ज्याने श्रद्धाळू शिवलिंगाचा अभिषेक करतात. ही पवित्र गुहा विंध्याचल पर्वताच्या टोकापासून २००० फूट खाली डोंगराच्या मधोमध आहे. येथील चढाई आणि ट्रेकिंग अमरनाथ यात्रेसारखीच आहे.

कुटुंबासह भगवान शंकर विराजमान

गुहेत प्रवेश करताच सर्वात आधी नाग आणि नागिणची आकृती आपल्याला दिसते. आत भगवान शिव (गणेश, पार्वती आणि कार्तिकेय ) आपल्या संपूर्ण कुटुंबासह विराजमान झालेले दिसतात. येथील स्थानिक लोकांची मान्यता आहे की येथे रोज सकाळी गुहेत ताजी फूले वाहीलेली दिसतात. परंतू आजपर्यंत कोणी या फुलांना वाहताना पाहिलेले नाही. या स्थानावर गुढ अदृश्य शक्तीची उपस्थिती जाणवत असते.

गुहेपर्यंत पोहचण्याचे दोन रस्ते

हे क्षेत्र हजारो वर्षे जुने असून अमरनाथ सारखेच श्रद्धेचे केंद्र बनलेले आहे. येथे गुहेपर्यंत पोहचण्यासाठी भक्तांना एकतर बडी जाम गावातून सुमारे 400 पायऱ्या चढून खाली उतरावे लागते. वा रोशियाबारी गावातून सुमारे चार किलोमीटर डोंगराळ रस्ता चालावा लागतो. हा रस्ता घनदाट जंगल, चढण आणि धबधब्यांच्या वाटेने जात असून रोमांचक असा आहे.

छोटा अमरनाथ केवळ धार्मिक आस्थेचे केंद्र नसून निसर्ग प्रेमी आणि ट्रेकिंगच्या शौकीनाची खास जागा आहे. येथे दरवर्षी श्रद्धाळू भेट देत असतात. येथे श्रद्धाळू सोबत पर्यटनासाठी देखील गर्दी होत असते. ज्या लोकांना अमरनाथ जाता येत नाही ते लोक या स्थळाला आवर्जून भेट देतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.