राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून पालघरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. गरज असेल तरच बाहेर पडण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
Bacchu kadu Live : बच्चू कडूंची आज पासून 'सातबारा कोरा' पदयात्राराज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू हे आजपासून 'सातबारा कोरा' पदयात्रा सुरु होणार असून पंजाबराव देशमुख यांच्या जन्मस्थानापासून ही यात्रा सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे.
Pune Live : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षणएका विकृत व्यक्तीने पुणे स्टेशन परिसरात असणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर चढून तो पुतळा तोडण्याचा व विद्रुप करण्याचा प्रयत्न रात्री घडला. त्या विकृत व्यक्तीला अटक केली असून आज सकाळी 11 वाजता पुणे रेल्वे स्टेशन स्थित असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ एकत्र जमून पुतळ्याचे संरक्षण त्याच बरोबर त्याची पावित्र व गरिमा ही सांभाळली गेली पाहिजे या करिता आपण पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण निषेध आंदोलन करणार आहेत.
Pune-Bangalore Highway Accident : हिरेबागेवाडीजवळ ५ वाहने एकमेकांवर आदळून दोघे ठारबेळगाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडकोळ्ळमठाजवळ भीषण साखळी अपघात होऊन दोघे ठार झाल्याची घटना घडली. शिवाप्पा चंबाप्पा शहापूर (रा. हुबळी), रफिक बशीरअहमद जांबोटी (रा. नंदगड) अशी त्यांची नावे आहेत. या अपघातात आणखी सहा जणांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Pune News : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न, एकाला पोलिसांनी घेतले ताब्यातपुण्यातील रेल्वे स्टेशनवरील घटना : सूरज शुक्ला नावाच्या व्यक्तीने रेल्वे स्टेशनच्या जवळील गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न केला. हातात कोयता घेऊन पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.
Navi Mumbai APMC Fire : नवी मुंबईत APMC शेजारील ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग, आठ ते दहा ट्रक-टेम्पो जळाल्याची शक्यतानवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शेजारी असलेल्या एका ट्रक ट्रमिनलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलीये. या आगीत 8 ते 10 ट्रक, टेम्पो जळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय.
Karnataka Political News : काँग्रेस मागासवर्गीय परिषदेच्या अध्यक्षपदी सिद्धरामय्यांची निवडबंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची मागासवर्गीयांसाठीच्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी अचानक नियुक्ती झाल्याने राजकीय उत्सुकता आणि चर्चा रंगली आहे. राज्यात काँग्रेसमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडतील, तसेच नेतृत्वातही बदल होईल, अशी अटकळ राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा बांधली जात आहे.
Karnataka News : केंद्रात-गोव्यात भाजप असताना म्हादई प्रश्न का सुटला नाही?बंगळूर : गोवा आणि केंद्रात भाजपचे सरकार असूनही, म्हादई समस्या का सोडवली गेली नाही? प्रथम केंद्रीय मंत्री कुमारस्वामींना त्यांचा शब्द पाळण्यास सांगा. त्यांना केंद्र आणि तामिळनाडूशी बोलण्यास सांगा आणि प्रकल्पासाठी परवानगी देण्यास सांगा, असे वक्तव्य कृषी मंत्री एन. चालुवरायस्वामी यांनी केले आहे.
Kolhapur Rain News : पंचगंगेच्या पाणी पातळीत अर्ध्या फुटाने घट; अद्याप २९ मार्ग बंद, ४८ बंधारे पाण्याखालीकोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात आज पावसाची उघडझाप राहिली, तर धरणक्षेत्रात दिवसभर हजेरी लावली. पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत दिवसभरात अर्ध्या फुटाने घट झाली; परंतु अद्यापही ४८ बंधारे पाण्याखाली असून, २९ मार्ग बंद आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
Weather Update News : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्यपुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढू लागला आहे. आज (ता. ७) कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, उतर महाराष्ट्र, विदर्भात जोरदार सरींची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.
CM Devendra Fadnavis News : 'महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी शक्ती दे'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाला घातले साकडेLatest Marathi Live Updates 7 July 2025 : ‘‘महाराष्ट्राची काळजी घेणे हे विठू माऊलीचे काम आहे. म्हणून महाराष्ट्र आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाकरिता मला शक्ती द्यावी आणि सर्वांना सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी,’’ असे विठुरायाच्या चरणी साकडे घातल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या मतदार यादी पडताळणीला प्रचंड राजकीय विरोध होत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने एक पाऊल मागे घेतले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर उद्योजक एलॉन मस्क यांनी ‘अमेरिका पार्टी’ या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढू लागला आहे. आज (ता. ७) कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज पावसाची उघडझाप राहिली, तर धरणक्षेत्रात दिवसभर हजेरी लावली. पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत दिवसभरात अर्ध्या फुटाने घट झाली. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..