धुळे : अनेकजण सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. परंतु ज्यांचे मोठे साम्राज्य आहेत; ते साम्राज्य वाचवण्यासाठी आज सत्ताधाऱ्यांसोबत जाऊन बसले असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा राज्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी माजी आमदार कुणाल पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली आहे.
धुळेग्रामीणचे माजी आमदार तसेच काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडत हजारो कार्यकर्त्यांसह नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांची जिल्हास्तरी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या काँग्रेसच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा राज्य प्रवक्ते सचिन सावंत यांची जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका केली आहे.
Nandurbar : चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; नेसू नदीवर पूल नसल्याने पुरातून काढावा लागतो मार्गआता काँग्रेसमध्ये २४ कॅरेट सोनं
काँग्रेसनावाच्या नदीचं सध्या शुद्धीकरण सुरू आहे. गाळ वाहून गेला असून सध्या पक्षात २४ कॅरेट सोनं उरले असल्याचे सावंत यावेळी म्हणाले. तसेच ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले. तेच आज त्यांच्या शेजारी जाऊन बसले आहेत. ज्यांची गरज आहे ते आमच्या सोबत आहेत. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता येणाऱ्या काळात या दिगजांचा पराभव करून त्यांना त्यांची जागा दाखवेल; असं म्हणत सचिन सावंत यांनी यावेळेस भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Amar Kale : योजनांवर कोट्यावधीचा खर्च मात्र शिक्षणावर दुर्लक्ष; खासदार अमर काळे यांची सरकारवर टीकाकाँग्रेसची मोर्चेबांधणी
काँग्रेसचे भक्कम नेतृत्व असलेले माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर धुळ्यात आता काँग्रेसची पुन्हा एकदा मोर्चे बांधणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाचे महासचिव तथा राज्य प्रवक्ते सचिन सावंत व खासदार शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची आढावा बैठक पार पडली आहे. या आढावा बैठकीमध्ये काँग्रेसचा धुळे जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यासाठी ही बैठक पार पडली आहे.