उपवासाची सुरुवात कधी आणि कशी झाली तुम्हाला माहीत आहे का?
उपवासाची सुरुवात आणि ऐतिहासिक महत्व या बद्दल अधीक माहिती जाणून घ्या.
उपवासाची सुरुवात फार पूर्वी, अनेक प्राचीन संस्कृती आणि धर्मांमध्ये झाली. उपवास हा शब्द 'उप' आणि 'वास' या दोन शब्दांपासून बनला आहे.
उपवास म्हणजे काही काळासाठी अन्न आणि पाण्यासारख्या गोष्टींचा त्याग करणे किंवा मर्यादित प्रमाणात सेवन करणे, ज्यामुळे आध्यात्मिक आणि शारीरिक शुद्धी साधता येते.
उपवासाच्या पद्धती इ.स.पू. १५०० च्या सुमारास वैदिक, हिंदू आणि जैन धर्मांमध्ये उदयास आल्याची मान्यता आहे.
जवळजवळ प्रत्येक प्रमुख धर्माने आध्यात्मिक विकासासाठी उपवासाचे स्वतःचे विधी विकसित केले आहेत. असे म्हंटले जाते.
हिंदू धर्मात, उपवास हा एकादशी, प्रदोष, किंवा पौर्णिमा यांसारख्या विशिष्ट दिवशी किंवा सणांच्या वेळी ठेवला जातो.
मुस्लिम धर्माततील लोक रमजान महिन्यात उपवास करतात.
उपवासाचा इतिहास खूप जुना आहे आणि वेगवेगळ्या धर्मांमध्ये आणि संस्कृतींमध्ये उपवासाचे महत्त्व व प्रथा वेगवेगळ्या आहेत.