भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. पण त्याआधी भारताचे खेळाडू रिषभ पंत, युजवेंद्र चहल, अभिषेक शर्मा यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह 'ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये हजेरी लावली होती. त्याचा एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला असून त्याचे काही क्लिप्सही सध्या व्हायरल होत आहेत.
IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Videoनुकताच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये गंभीर पंतला खेळाडूला संघातून बाहेर काढण्याबद्दल सांगत असल्याचे दिसत आहे. झाले असे की हे सर्व गमतीने सुरू होते. शोचा होस्ट कपिल शर्माने रिषभ पंतला आयपीएल २०२५ साठी २७ कोटी रुपये मिळाल्याबद्दल विचारले.
त्याने म्हटले की एवढे पैसे मिळाले, पण तुझी फलंदाजी चांगली झाली नाही, अशावेळी जेव्हा संघातील दुसरा खेळाडू चांगला खेळतो, तेव्हा तू त्याला म्हणतो का की पैसे जास्त घे, पण धावा कमी कर.
त्यावर रिषभने कपिल शर्माला प्रत्युत्तर देताना म्हटले की 'जेव्हा स्टेजवर तुमच्यापेक्षा कोणीतरी चांगलं परफॉर्म करतो, चांगली कॉमेडी करतो, तेव्हा तू काही बोलतो?'त्यावर कपिल म्हणाला, 'मी त्यांचा सीनच कापतो.' त्याच्या उत्तरावर सर्वच हसले.
तेव्हा गंभीर पंतला मजेने सल्ला देताना म्हणाला, 'तू त्याला सांग ना की मी त्या खेळाडूलाच संघातून ड्रॉप करतो.' ते ऐकूनही सर्वच जण हसायला लागले. शेवटी पंत म्हणतो, 'माझं नाव पंत आहे, पण मला संत समजू नका.' हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
View this post on InstagramA post shared by Netflix India (@netflix_in)
याशिवाय कपिल शर्माने संघात कोण कोणत्या नात्याप्रमाणे आहे, असाही एक सेगमेंट घेतला होता. यामध्ये जेठानी, जी सर्वांवर दादागिरी करते, असं कोण विचारल्यानंतर रिषभने रोहित शर्माचे नाव घेतले होते.
त्यावर गंभीर लगेचच म्हणाला, रोहित तर निवृत्त झाला आहे. त्यानंतर संघातील देवराणी अनेक खेळाडू असल्याचे पंतने सांगितले. त्यानंतर त्याने यासाठी सूर्यकुमार यादवचे नावही घेतले.
Gautam Gambhir: तू म्हणाला तेच केलं, हवे ते खेळाडू दिले, आता रिझल्ट दे अन्यथा...! गंभीरला इशारा; IND vs ENG दुसऱ्या कसोटीवर लक्षयानंतर युझवेंद्र चहलने फुफा (आत्याचा नवरा), जो सारखा नाराज होतो, असा खेळाडू कुलदीप यादव असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, कुलदीप कधीही नाराज होई शकतो. आत्ता हे सर्व ऐकून पण तो नाराज होऊ शकतो. तसेच नेहमीच तक्रार करणारा जिजा मोहम्मद शमी असल्याचे रिषभ पंतने सांगितले. याशिवाय बुमराह हा सासू सारखा असल्याचेही तो म्हणाला, जो कधीही खूश होत नाही.
दरम्यान, या एपिसोडचे शुटिंग आधी झाले असून सध्या रिषभ पंत आणि गौतम गंभीर भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी मालिकेत व्यग्र आहेत.