रहस्यमय! किर्रर रात्री मृत तृतीयपंथीयाला चालवत स्मशानभूमीपर्यंत नेतात, तुम्हाला हे माहीत आहे का?
Tv9 Marathi July 08, 2025 12:45 AM

आपल्या समाजात तृतीयपंथीयांबाबतचा एक वेगळा दृष्टीकोण आहे. त्यांना सामान्य लोकांच्या श्रेणीत ठेवलं जात नाही. त्यामुळेच लोक त्यांच्या बाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात. तृतीयपंथीयांना समाजात थर्ड जेंडर म्हणून संबोधलं जातं. तृतीयपंथीयांचं आयुष्य आपल्यापेक्षा सामान्य नसतं. त्यांचं राहणं, वागणं, बोलण्यापासून ते त्यांच्या परंपरा आणि प्रथाही वेगळ्या असतात. त्यांचे सण उत्सवही वेगळे असतात. एवढेच नव्हे तर एखादा तृतीयपंथीयाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची प्रथाही वेगळी आहे. त्यामुळेच तृतीयपंथीयांचं जग हे वेगळं आणि रहस्यमयी मानलं जातं.

जन्मापासून मृत्यूपर्यंत तृतीयपंथीयांचे नियम वेगवेगळे असतात हे तुम्हाला माहीत आहे का? तृतीयपंथीयाचा जन्म झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण त्यांच्या अंत्ययात्रेबाबत कधी ऐकलं आहे का? कधी संपूर्ण आयुष्यात तृतीयपंथीयांची प्रेतयात्रा पाहिली आहे का? सर्वच धर्मियांच्या अंत्ययात्रा दिवसा काढल्या जातात, मग तृतीयपंथीयांचीच अंत्ययात्रा रात्रीच का काढली जाते? आणि ही अंत्ययात्रा कशी असते माहीत आहे का? याबाबतच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

वाचा: मला एक पप्पी दे, हवं ते देतो; पुण्यात 73 वर्षीय थेरड्याकडून तरुणीचा विनयभंग

म्हणून रात्री अंत्ययात्रा

कोणत्याही सामान्य स्त्री किंवा पुरुषांनी तृतीयपंथीयांची अंत्ययात्रा पाहू नये म्हणून ही अंत्ययात्रा रात्रीच काढली जाते. तृतीयपंथीयांचा हा रिवाज आहे. तृतीयपंथीयांच्या अंत्ययात्रेत दुसऱ्या जातीचे लोक असू नये असाही या समुदायाचा दंडक आहे. त्यांचं कारण म्हणजे ही अंत्ययात्रा इतर सामान्य लोकांनी पाहिली तर मृत तृतीयपंथीयाचा पुनर्जन्म तृतीयपंथी म्हणूनच होतो. हा जन्म होऊ नये म्हणूनच सामान्य व्यक्तीच्या नजरेत अंत्ययात्रा पडू नये म्हणून मध्यरात्री किर्रर अंधारात ही अंत्ययात्रा काढली जाते.

एखाद्या तृतीयपंथीयाचा मृत्यू झाला तर तृतीयपंथीय समाज मातम करत नाही. शोक करत नाही. मृत्यूमुळे तृतीयपंथी व्यक्तीला इथल्या नरकातून मुक्तता मिळते, असा या समुदायाचा समज आहे. त्यामुळेच त्याचा शोक केला जात नाही.

तृतीयपंथीयाच्या मृतदेहावर गुपचूप पद्धतीने अंतिम संस्कार केले जातात. कुणालाही माहीत पडणार नाही याची काळजी घेतली जाते. रात्री अंत्ययात्रा काढताना मृतदेहाला चपला आणि बुटाने मारलं जातं. दरम्यान, तृतीयपंथी हिंदू धर्म मानतात. पण हे लोक मृतदेह जाळत नाहीत, तर त्याचं दफन करतात. तसेच स्वत:च्या पैशाने दान केलं जातं. कारण मेलेली व्यक्ती पुन्हा तृतीयपंथीय बनून जन्मू नये.

कशी निघते अंत्ययात्रा?

तृतीयपंथीयांची अंत्ययात्राही वेगळी असते. बऱ्याचदा मृतदेहाच्या पायाला पाय बांधले जातात. त्या मृतशरीराच्या खांद्यावर हात टाकून मृतदेहाला पायी चालत चालत स्मशानभूमीपर्यंत नेलं जातं. ती मयत आहे असं वाटू नये हे यामागचं कारण असतं. त्यामुळे एखाद्याने चुकून पाहिलं तरी त्याला ती अंत्ययात्रा वाटत नाही. शिवाय तृतीयपंथीयांची अंत्ययात्रा पाहिल्यावर माणूस करोडपती होतो असं सांगितलं जातं. पण असं काही नसल्याचं तृतीयपंथीयांचं म्हणणं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.