पानीपतमध्ये झालेल्या लढायांपैकी तीन प्रमुख लढाया झालेल्या आहेत.
१५२६मध्ये बाबर आणि इब्राहीम लोदी यांच्यात झाली होती.
१५५६मध्ये अकबर आणि हेमू यांच्यात झाली होती.
१७६१मध्ये अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये झाली होती.
या लढायांनी भारताच्या इतिहासाची दिशा बदलली. मात्र या सर्वांनी लढाईसाठी पानीपतचीच निवड का केली?
दिल्ली बेचिराख होण्यापासून वाचवण्यासाठी आणि दिल्लीस सुरक्षित ठेवण्यासाठी दिल्लीतली राजे महाराजे पानीपतची निवड करायचे.
कारण त्या काळात दिल्ली काबीज करण्यासाठी येणारे आक्रमक पंजाबहून यायचे आणि त्यांना दिल्ली गाठण्यासाठी पानीपत मार्गे जावे लागायचे.
तर दुसरीकडे आक्रमणकर्ते दिल्लीत पोहचू नये म्हणून आधीच दिल्लीच्या राजांचे सैन्य पानीपतमध्ये येऊन सज्ज राहयाचे.
त्या काळात दिल्ली असे ठिकाण होते, जिथे एकाबाजूस यमुना तर दुसऱ्या बाजूस दिल्लीस समांतर असा कालवा होता. यामुळे सैन्याला पाण्याची उपलब्धता असायची.