हा व्हिडिओ पाहिल्यावर कळेल 1 सेकंदाचे महत्त्व, मृत्यूच्या दारातून परत आला बाईकस्वार
Tv9 Marathi July 08, 2025 04:45 PM

Trending Video : समाज माध्यमावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे की तो पाहून कुणाच्या पण काळजाचा थरकाप उडेल. व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार अत्यंत वेगाने रस्त्यावरील वाहनांमधून वाट काढताना दिसतो. चिंचोळ्या पट्टीतून तो दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. बाईकचा अतिवेगामुळे अनेकाचा जीव खालीवर होतो. हा बाईकस्वार एका कारच्या अगदी जवळून जातो. कारला टक्कर देणार इतक्यात तो वाचतो. त्यावेळी अनेकांच्या काळजात धस्स होते. त्यांच्या काळजाचा थरकाप उडतो. एक सेंकद तर मोठा अपघात होतो की काय असे वाटते. पण हा दुचाकीस्वार वाचतो आणि वाहनांच्या मधून बाईक दामटतो.

मृत्यूच्या दारातून परत आला दुचाकीस्वार

हा बाईकस्वार इतक्या वेगात असताना पण व्हिडिओ शूट करताना दिसतो. तो व्हिडिओ शूट करताना हे विसरतो की तो हायवेवर बाईक चालवत आहे. या व्हिडिओत हे स्पषपणे दिसते की, तो मुद्दामहून खतरनाक स्टंट करत आहे. तो त्याचा जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर झाल्यावर लोकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. असे स्टंट करणारा त्याचाच नाही तर इतरांचा पण जीव धोक्यात घालत असल्याचे युझर्स म्हणत आहेत.

कार चालकाने कार थांबवून केली विचारपूस

या खतरनाक स्टंटमधून हा बाईकस्वार वाचला. अपघात होता होता तो बचावला. ज्या कासोबत अपघात होणार होता. तो कार चालकही पुढे जाऊन कार थांबवतो आणि बाईकस्वाराची विचारपूस करतो. त्यावेळी दुचाकीस्वार त्याला आपण ठीक असल्याचे सांगतो. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर युझर्स संताप व्यक्त करत आहे. बाईकस्वाराने आपला आणि इतर वाहन चालकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप त्याच्यावर करत आहेत.

A Biker weaving through cars BARELY avoided a terrible accident and the driver even pulled over to hug him after potential catastrophe pic.twitter.com/1TqB9BuGWB

— Dudes Posting Their W’s (@DudespostingWs)

दैव बलवत्तर नाही तर जीव गेला असता

हा व्हिडिओ @DudespostingWs नावाच्या एक्स खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेक लोकांनी या व्हिडिओवर लाईक, कमेंट केल्या आहेत. यासारख्या लोकांमुळे अनेकांचा जीव धोक्यात येतो, अशी प्रतिक्रिया एका युझर्सने दिली आहे. तर त्याचे नशीब चांगले होते, नाही तर त्याचा जीव गेला असता, अशी कमेंट दुसर्‍याने लिहिली. तर ही पूर्णपणेबाईकस्वारची चूक होती अशी कमेंट पण करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.