भारताच्या ‘या’ शेजारील देशात युट्यूबवर बंदी, काय आहे कारण ?
GH News July 08, 2025 08:06 PM

युट्यूब हे मनोरंजनाचे साधन आहे, भारतातील बहुतांशी लोक यूट्यूब पाहतात. यूट्यूबवर महत्वाची माहिती, चित्रपट, माहितीपट पाहता येतो. तसेच भारतातील बऱ्याच लोकांचे यूट्यूब चॅनल आहेत. याद्वारे लोक लाखो रुपयांची कमाई करत आहेत. मात्र भारताच्या शेजारील एका देशात यूट्यूबवर बंदी आहे. हा देश कोणता आणि युट्यूबवर का बंधी आहे याचे उत्तर जाणून घेऊयात.

इंटरनेट फ्रीडम रिपोर्ट 2024 च्या अहवालानुसार चीनमध्ये युट्यूबवर बंदी आहे. चीन हा भारताच्या शेजारील देश आहे. चीनमध्ये फक्त युट्यूब नव्हे तर फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील बंदी आहे. चीन सरकारने ‘ग्रेट फायरवॉल ऑफ चायना’ नावाचे इंटरनेट सेन्सॉरशिप धोरण लागू केले आहे, त्यामुळे ही बंदी आहे.

युट्यूबवर का बंदी आहे?

चीनी सरकार त्यांच्या विचारांच्या किंवा धोरणाच्या विरुद्ध असलेली माहिती ब्लॉक करते. युट्यूबवर असलेली माहिती ही चीनी सरकारचे विरोधात असू शकते, सरकारविरोधी सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलले गेले आहे. चीनमध्ये युट्यूबऐवजी युकू, टेन्सेंट व्हिडिओ आणि बिलिबिली ही स्थानिक प्लॅटफॉर्म वापरली जातात. यातून नागरिकांचे मनोरंजन होते.

VPN वापरून युट्यूब पाहता येते

चीनमध्ये सरकारकडून मंजूरी असलेले VPN वापरून यूट्यूब पाहता येते. मात्र अशा मार्गांचा वापर करताना शासनाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. VPN वापरणाऱ्या लोकांवर सरकार दबाव आणते किंवा त्या सेवा ब्लॉक करते. तसेच मान्यता प्राप्त VPN वापरून परदेशी साइट्सला भेट देता येते. याचाच अर्थ चीनमधील सरकारने नागरिकांच्या हक्कावर बंदी आणलेली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.