निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपण आपल्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करण्याची शिफारस तज्ञ करत असतात, कारण जेव्हा तापमानात उष्णता आणि थंडी किंवा आर्द्रता वाढते. यासाठी हवामानातील बदलानुसार पोषक तत्वांनी समृद्ध आहार घेणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील. तसेच पावसाळ्यात पचनक्रिया निरोगी ठेवणारा आहार घ्यावा, कारण आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया वाढतात आणि या दिवसांमध्ये अतिसार आणि मळमळ इत्यादी समस्या खूप लवकर उद्भवतात. योग्य आहार घेतल्याने तुम्ही पावसाळ्यात आजारी पडण्यापासून स्वतःचे रक्षण करू शकता.
पावसाळ्यात हलके पचायला सोपे आणि ताजे शिजवलेले पदार्थांचे सेवन करणे नेहमी चांगले. रस्त्यावरील फास्ट फूडचे सेवन टाळावे आणि हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. पाणी पिण्यापूर्वी उकळून किंवा गाळून घ्यावे. तर याव्यतिरिक्त आपण आहारात कोणते पदार्थ सेवन करावे व करू नये याबद्दल जाणून घेऊयात…
पावसाळ्यात आपण आपल्या आहाराकडे अधिक लक्ष का दिले पाहिजे?
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट गीतिका चोप्रा सांगतात की, पावसाळ्यात बॅक्टेरिया देखील वेगाने पसरतात जे अन्न-पदार्थांद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात आणि तुम्हाला आजारी बनवू शकतात. पावसाळ्यात पचनक्रिया कमकुवत होते, म्हणून तुम्ही घेत असलेला आहार अधिक काळजीपुर्वक घ्यावा.
पावसाळ्यात काय खाऊ नये?
डॉ. गीतिका यांच्या मते पावसाळ्यात रस्त्यावरील पदार्थ आणि पाणीपुरी पूर्णपणे खाणे टाळा. तसेच कच्चे सॅलड सेवन करताना त्याआधी ते चांगले धुऊनच खावे. शिळे अन्न किंवा फ्रीजमध्ये उरलेले पदार्थ खाऊ नका. टाळा. याशिवाय जास्त तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ तुमच्या आतड्यांचे आरोग्य बिघडवु शकते म्हणून ते देखील खाणे टाळणे महत्वाचे आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ आणि आहार
पावसाळ्यात हळद, अदरक आणि तुळशीचा चहा आणि दूध तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करते. तसेच दुधी आणि पडवळ यांसारख्या हिरव्या भाज्याचे सेवन करावे कारण या भाज्या पचण्यास सोप्या असतात आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात. भाज्यांची खिचडी, मूग डाळ, डोसा, इडली, चिल्ला यासारखे तसेच नाचणी पासून तयार केलेले पदार्थ खा. याशिवाय आहारात भरपूर बाजरीचा समावेश करा. कारण पावसाळ्यात यांच्या सेवनाने तुमच्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. तर यादिवसांमध्ये हर्बल टी प्या. यामुळे खोकला आणि सर्दीशी लढण्यास मदत होते आणि बेरीसारखे हंगामी पदार्थ पूर्णपणे धुतल्यानंतरच खा.
मांसाहारी पदार्थ खाल्ल्यास काय लक्षात ठेवावे?
पावसाळ्यात सीफूड पदार्थ खाणे टाळावे, जर तुम्ही पावसाळ्यात मांसाहारी पदार्थ खात असाल तर लक्षात ठेवा की जर ते चिकन असेल तर ते ताजे असावे. तळलेले आणि मसालेदार मांसाहारी पदार्थ खाण्याऐवजी ते कमी मसाल्यांनी ग्रिल केलेले किंवा शिजवुन खा. अर्धशिजवलेले किंवा कच्चे मांसाहारी पदार्थ खाणे टाळा. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही आजारी न पडता पावसाळ्यात पावसाचा आनंद घेऊ शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)