आजच्या धावपळीच्या जगात झोप न येणे आणि डोकेदुखी ही सर्वसामान्य समस्या बनली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मानसिक तणाव, मोबाईल फोन आणि लॅपटॉपचा अतिरिक्त वापर,खराब लाईफस्टाईल, चिंता,जादा कॅफीनचे सेवण आणि झोपेच्या अनियमित वेळा असू शकतात. अनेकदा पोषक तत्वांची कमतरता आणि हार्मोनल इम्बॅलन्स देखील झोप आणि डोकेदुखीचे कारण असू शकते.ज्यावेळी आपण रात्रभर जागतो किंवा नीट झोपत नाही,तेव्हा याचा थेट परिणाम डोके आणि शरीरावर होतो. अशा वेळी पतंजली आयुर्वेदाने सांगितलेल्या नैसर्गिक औषधाने ही समस्या काही प्रमाणात सुटू शकते.
पतंजली संशोधन संस्था, हरिद्वार यांच्या संशोधनात पतंजलीचे दिव्य मेधा वटी झोन न येण्याच्या समस्येपासून आराम देऊ शकते. तसेच डोकेदुखीला दूर करु शकते. लागोपाठ डोकेदुखी आणि झोप न आल्याने आपल्या कामावर परिणाम होतो. व्यक्तीला प्रत्येक वेळी थकल्यासारखे वाटते, चिडचिडेपणा वाढतो, एकाग्रता कमी होते. मेंदूला आराम न मिळाल्याने विस्मरणाचा आजार दूर होतो. मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होत जाते. त्यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो. झोप पूर्ण न झाल्याने हॉर्मोन्स बॅलन्स बिघडतो. त्यामुळे वजन वाढते. त्वचेच्या समस्या वाढतात.आणि पचन यंत्रणा बिघडते. सततच्या डोकेदुखीने मायग्रेनसारखा त्रास सुरु होतो.त्यामुळे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
आयुर्वेदाने दिव्य मेधा वटीला एक प्रभावशाली औषध मानले असून त्याने मेंदूला शांतता लाभते. पतंजली संशोधनानुसार हे औषध डोके दुखी,एंजाईटी कमी करण्यास मदत करते. ब्राह्मी, शंखपुष्पी, अश्वगंधा आणि जटामांसी सारख्या जडीबुटीपासून हे औषध बनले आहे. ते मेंदूच्या नसांना शांत करते. झोपेला नैसर्गिक पणे वाढवते.याच्या नियमित सेवनाने मानसिक थकवा दूर होतो. एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती चांगली होते.
या औषधाने स्ट्रेस हॉर्मोन आणि ब्लड प्रेशर नियंत्रित होते. मानसिकदृष्ट्या बळ मिळते, अभ्यास करणाऱ्या मुलांना, ऑफिसात काम करणारे तरुण आणि वयस्कांसाठी हे औषध लाभकारी आहे. याचे सेवन करण्याआधी कोणत्याही आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हे औषध रोजी रिकाम्या पोटी वा जेवणानंतर कोमट पाण्यासोबत घ्यावे.
जादाकाळ मोबाईल,लॅपटॉप आणि टीव्ही पाहणे टाळावा
रात्री झोपण्याआधी किमान एक तास आधी कोणतीही स्क्रीन पाहू नका
रात्रीचा कॅफीन आणि जड आहार घेऊ नये
योग आणि एक्सरसाईजला दिनश्चर्यचा भाग बनवा
तनाव कमी करण्यासाठी मेडिटेशन करा, पुरेसे पाणी प्या, बॅलेंस्ड डायट करा