चिपळूणमध्ये ताबूत मिरवणूक
esakal July 08, 2025 09:45 PM

-rat७p९.jpg -
P२५N७५९५८
चिपळूण ः पिंपळी येथे मोहरमनिमित्ताने अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील यांचा मिरवणुकीदरम्यान सत्कार करताना मुस्लिम बांधव.
-------
चिपळूणमध्ये ताबूत मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः मोहरमनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवारी (ता. ६) ताबूतची मिरवणूक काढण्यात आली. मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून हा उत्सव साजरा करण्यात आला. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जाणारा हा उत्सव रत्नागिरी जिल्ह्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून ओळखला जातो.
मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन यांनी करबला येथे दिलेल्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ मुस्लिम बांधव ताबूत विसर्जनाच्या दिवशी शोक व्यक्त करतात आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करतात. या निमित्ताने ताबूतची मिरवणूक काढली जाते. मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधव दोन दिवस उपवास ठेवतात. मुस्लिम बांधवांसह हिंदू धर्मीयही या ताबूतची पूजा करतात. काही गावांमध्ये ताबूतमध्ये नारळ ठेवण्याचा मान हिंदू धर्मातील लोकांचा आहे. ताबूतची मिरवणूक निघाल्यानंतर काही गावांमध्ये देवीच्या भेटीसाठी ताबूत नेले जाते. या वेळी हिंदू बांधवांकडून गूळ, धूप, अगरबत्तीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे मोहरम सण हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान म्हणून मानला जातो. चिपळूणमध्येही एकतेचा हा प्राचीन वारसा आजही मोठ्या अभिमानाने जपला जात आहे. तालुक्यातील सावर्डे, कोकरे, नायशी, कुटरे, चिपळूण शहर, कामथे, पिंपळी, पोफळी येथे मोहरम सण उत्साहात साजरा करण्यात आला.
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.