अनैतिक संबंधातून पतीची हत्या केल्याच्या घटना सध्या सर्रास घडत आहेत. महाराष्ट्रात नागपूरमध्ये अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आजारी नवऱ्याला संपवलं. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी कठोरतेने महिलेची चौकशी केल्यानंतर तिने सर्व सत्य सांगितलं. ही संपूर्ण घटना नागपूरच्या तारोडी खुर्द भागाशी संबंधित आहे.
आरोपी महिलेच नाव दिशा रामटेक आहे. महिलेच वय 30 वर्ष आहे. मृतकाच नाव चंद्रसेन रामटेक आहे. मृतक पक्षाघाताचा रुग्ण होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. आरोपी महिला दिशा रामटेकने प्रियकर आसिफ ऊर्फ राजाबाबू टायरवालाच्या मदतीने शुकव्रारी पतीची हत्या केली. चंद्रसेन रामटेकच्या आजारपणामुळेच आरोपी महिला आणि तिचा प्रियकर जवळ आले, असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांची काय दिशाभूल केली?
मृतक चंद्रसेनला पत्नी आणि आसिफच्या संबंधांबद्दल समजलं. त्यावरुन दोघांमध्ये बराच वाद झाला. त्यानंतर चंद्रसेन रामटेकच्या हत्येचा कट रचण्यात आला. आरोपी महिला दिशाने पतीला बिछान्यात पकडून ठेवलं. प्रियकराने त्याचा चेहरा दाबला. सुरुवातीला आरोपी महिलेने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पतीचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याच सांगितलं.
पोस्टमार्टम रिपोर्टमधून खुलासा
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये चंद्रसेनचा मृत्यू गळा आवळण्यामुळे झाल्याच स्पष्ट झालं. पोलिसांनी आरोपी महिला तिच्या प्रियकराला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये व्यावसायिक राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. लग्नाला महिना होण्यापूर्वीच सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहने मिळून हे भयानक हत्याकांड घडवून आणलं.