भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्याबाबत सोशल मीडियावर कायम चर्चा होत असते. पण याबाबत दोघांनी कधीच काहीच सांगितलं नाही. त्यामुळे या निव्वळ चर्चा आहेत. पण या दोघांबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. त्याचं कारण ठरलं ते भारताचा माजी क्रिकेपटू युवराज सिंह याच्या युवीकॅन फाउंडेशन चॅरिटी डिनरचं. लंडनमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला या दोघांनी हजेरी लावली होती. त्यामुळे एकाच कार्यक्रमात एकत्र आल्यानंतरच चर्चा तर होणारच.. असं असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओत शुबमन गिल हा सारा तेंडुलकरकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच नव्या चर्चांना उधाण आलं आहे. अशा परिस्थितीत शुबमन आणि साराची मैत्री तुटण्याच्या दाव्यांमध्ये काही तथ्य असल्याचं बोललं जात आहे.
युवीकॅन फाउंडेशनच्या कार्यक्रमाला सारा तेंडुलकर उपस्थित होती. थोड्या वेळाने शुबमन गिलने या कार्यक्रमाला हजेरी लावली. पण शुबमन गिल तिच्या समोरून गेला आणि तिच्याकडे पाहीलं देखील नाही. चाहत्यांच्या मते, साराने गिलकडे पाहीलं होतं. पण शुबमन गिलने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. दरम्यान, शुबमन किंवा सारा दोघांनीही कधीही या चर्चांवर आपलं मत मांडलं नाही.सोशल मीडियावर दोघेही अनेकदा एकमेकांचे फोटो लाईक करायचे. पण काही महिन्यांपूर्वी सारा आणि शुबमन यांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. दोघेही आता सोशल मीडियावर मित्र नाहीत.
In the first video, Shubman Gill ignored Sara, but in the second one, he was lowkey watching her.
Blud is so shy man 😭😭 pic.twitter.com/eLcnNnIXqM
— Rohan💫 (@rohann__45)
भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर आहे. आतापर्यंत पाच सामन्यातील दोन सामने झाले असून 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या दोन सामन्यात शुबमन गिलने तीन शतकं ठोकली. यात एका द्विशतकाचा समावेश आहे. एजबेस्टन कसोटीच्या दोन्ही डावात मिळून 430 धावा केल्या आहेत. एका कसोटीत भारतीय खेळाडूकडून केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.