जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश इंडोनेशियाने आपली सुरक्षा वाढवायला प्राधान्य दिलं आहे. इंडोनेशिया कुठल्या एका देशाकडून नाही, तर पाच वेगवेगळ्या देशांकडून शस्त्रास्त्रांची खरेदी करत आहे. यात फ्रान्स, ब्रिटन, इटली, नेदरलँड आणि तुर्की या देशांचा समावेश आहे. सध्या इंडोनेशियाकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या युद्धनौका आहेत. यात बहुतांश छोट्या युद्धनौका आणि जुन्या पाणबुड्या आहेत. किनाऱ्याजवळ गस्तीसाठी त्यांचा वापर केला जातो.
इंडोनेशियाच्या नौदलाची ताकत आतापर्यंत फक्त देशाच्या किनाऱ्याच्या आसापासच मर्यादीत आहे. यापुढे खोल समुद्रात शक्ती प्रदर्शन करण्याइतपत ताकत वाढवायची हा इंडोनेशियाचा नव्या संरक्षण करारामागे इरादा असल्याच म्हटलं जातय. म्हणून इंडोनेशियाकडून सतत संरक्षण कराराला मंजुरी देणं सुरु आहे.
इंडोनेशिया का सुरक्षा वाढवतोय?
इंडोनेशियाचा चीन, मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांसोबत समुद्री वाद आहे. हा प्रश्न एखाद्यादिवशी गंभीर बनू शकतो असं इंडोनेशियाला वाटतं. इंडोनेशियाच नैटुना बेट दक्षिण चीन समुद्रात आहे. चिनी कोस्ट गार्ड आणि मासेमारी करणाऱ्या युद्धनौका अनेकदा इंडोनेशियाच्या समुद्र सीमेत घुसखोरी करतात. असे प्रकार रोखण्यासाठी इंडोनेशिया आपली ताकत वाढवत आहे.
चॅलेंज काय?
इंडोनेशिया 17,000 पेक्षा अधिक बेटं असलेला द्वीपीय देश आहे. याच समुद्री क्षेत्रफळ 5.8 मिलियन वर्ग किलोमीटरपेक्षा अधिक पसरलेलं आहे. इतक्या विशाल क्षेत्राची देखरेख आणि सुरक्षेसाठी आधुनिक सैन्य तंत्रज्ञान आणि अधिक सैन्य तैनाती आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया आणि AUKUS आघाडी म्हणजे UK-US Pact मुळे इंडोनेशिया हैराण आहे. मलक्का जलडमरू क्षेत्रात समुद्री दहशतवाद आणि लुटारु यांची सक्रीयता आव्हान बनत चालली आहे.
कुठल्या पाच देशांकडून काय शस्त्र विकत घेतली?
फ्रान्स : इंडोनेशियाने फ्रान्सच्या युद्धजहाज निर्मिती करणाऱ्या नेवल ग्रुपला दोन डीजल–इलेक्ट्रिक स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. या दोन पाणबुड्या मिळाल्यानंतर इंडोनेशियाकडे एकूण 6 पाणबुड्या होतील. सध्या इंडोनेशियाकडे फ्रान्सन बनवलेल्या दोन युद्ध नौका आहेत. इंडोनेशियन नेवी याचा वापर करते.
यूके : ब्रिटेनच्या एरोहेड 140 डिजाइनच्या आधारावर इंडोनेशिया दोन फ्रिगेटची निर्मिती करत आहे. यासाठी सरकारी स्वामित्व वाली जहाज निर्माता कंपनी पीटी पॉलशी करार झाला आहे. त्याशिवाय ब्रिटिश पाणबुडे आणि पाणबुडी बचाव उपकरण निर्माता कंपनीशी पाणबुडी बचाव प्रणाली देण्यासाठी करार केला आहे.
इटली : इटलीची जहाज निर्माता कंपनी फिनकॅटिएरीला इंडोनेशियाने दोन जहाजांची ऑर्डर दिली आहे. यातील एकाची डिलीवरी झाली आहे.
नेदरलँड : इंडोनेशियाने चार डिपोनेगोरो श्रेणी आणि दोन मोठ्या जहाजांची डील केली आहे.
टर्की : टर्की आणि इंडोनेशियामध्ये झालेल्या करारानुसार तुर्कीची TAIS शिपयार्ड दोन फ्रिगेटची निर्मिती करणार आहे. त्या शिवाय फायटर जेटवर सुद्ध बोलणी सुरु आहेत.