“जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, असा असतो”, असं वक्तव्य रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. नागपूरमध्ये ‘मोरोपंत पिंगळे: द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जर’ या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत. भागवत यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी मोरोपंत पिंगळे यांची एक आठवण सांगताना मोहन भागवत म्हणाले की, “पिंगळे म्हणाले होते की, जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, तुमचं वय झालं आहे. आता जरा बाजूला सरा, आम्हाला ही करू द्या.”