ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'
esakal July 10, 2025 06:45 AM

भारत आणि इंग्लंड संघांतील कसोटी मालिकेतील तिसरा सामना क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्सवर गुरुवारपासून (१० जुलै) खेळवला जाणार आहे. हा सामन्यात दोन्ही संघ चुरशीने खेळतील अशी अपेक्षा सर्वांना आहे, कारण या मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे.

त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिकेत वरचढ निर्माण करण्याची संधी दोन्ही संघांना असणार आहे. जो हा सामना जिंकेल, त्याला पुढील दोन सामन्यात मालिका विजयाची संधी असेल, अशात तिसरा सामना जिंकून पुढील दोन सामन्यांसाठी प्रतिस्पर्धी संघाला दबावात ठेवण्याच्या हेतूने दोन्ही संघ या सामन्यात उतरणार आहेत.

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या हुकमी एक्क्यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासाठी जसप्रीत बुमराह प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करत आहे, तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरचे चार वर्षांनंतर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करत आहे. दरम्यान, या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा उपकर्णधार रिषभ पंतपत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने अनेक विषयांवर मत व्यक्त केले.

रिषभने अद्याप भारताचे प्लेइंग इलेव्हनचे संमिश्रण ठरले नसल्याचे सांगितले. पण त्याने असेही संकेत दिले की लॉर्ड्सवर कदाचित एकच फिरकीपटू गोलंदाजाला खेळवले जाऊ शकते. जर असे झाले, तर वॉशिंग्टन सुंदरला बाहेर जावे लागू शकते. पंत म्हणाला, 'पर्यायांची अजूनही चर्चा सुरू आहे. कधीकधी खेळपट्टी दोन दिवसात रंग बदलते. आम्ही आता याबाबत निर्णय घेऊ की ३ वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू खेळवायचा की तीन वेनवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू खेळवायचे.'

लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळवण्याची शक्यता आहे. इंग्लंडने या खेळपट्टीवर गवत ठेवण्यास सांगितले आहे.

दरम्यान, आर्चरच्या पुनरागमनाबद्दल बोलताना रिषभ म्हणाला, 'जेव्हाही मी मैदानात असतो, तेव्हा क्रिकेटचा आनंद घेतो. मी २०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो. हा चांगला सामना होईल. आर्चरही दीर्घकाळानंतर पुनरागमन करत आहे. आता पाहून कसा खेळ होईल, मला आनंद आहे की आर्चर पुनरागमन करत आहे.'

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले स्टंपमागे किंवा फलंदाजी करताना सातत्याने का बोलतो?

रिषभ पंत यष्टीरक्षण करत असताना किंवा फलंदाजी करत असताना सातत्याने स्वत:शी किंवा संघसहकाऱ्यांशी बोलताना दिसतो. त्याचे बोलणे स्टंपमाईकमध्येही रेकॉर्ड होते. पण ही सवय का लागली, याचा खुलासा त्याने केला आहे.

तो म्हणाला, 'यामागचा विचार इतकाच की फलंदाज म्हणून स्वत:ची बोलत राहयचं. हे नेहमीसारखंच आहे, पण या मालिकेत स्टंप माईकमध्ये जास्तच संवाद कैद झाले आहेत. पण फलंदाज म्हणून मी त्याच गोष्टी करतोय, ज्या मी करत आलोय. लहान असताना मी स्वत:ला सांगत रहायचो की मला काय करायचं आहे. माझे प्रशिक्षक दिवंगत तारक सिन्हा सर यांनी मला सल्ला दिला होता की स्वत:शी बोलत राहा. त्यांनी मला ज्या गोष्टी शिकवल्यात, त्या मी आजही फॉलो करतो.'

दरम्यान, रिषभ पंत देखील या मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने पहिल्या सामन्यात दोन्ही डावात शतके केली होती, तर दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या डावात अर्धशतक केले होते. त्यामुळे लॉर्ड्सवर तो कशी कामगिरी करणार याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.