हरवलेले मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः हरवलेले किंवा चोरीला गेलेले १७० महागडे मोबाईल आज घाटकोपर पोलिस ठाण्यात मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. परिमंडळ सातचे पोलिस उपआयुक्त राकेश ओला, सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश पासलवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळवंत देशमुख, पोलिस निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल चोरी प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग साळुंखे, अंमलदार दीपक भारती, नीलेश पवार, अमोल सूर्यवंशी, अजय अहिरे यांनी मोबाईलचा शोध घेतला. मुंबईसह गुजरात, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल अशा विविध राज्यांतून १९ लाख ४१ हजार ७०० रुपये किमतीच्या १७० मोबाईलचा तपास लावला.