Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील
esakal July 10, 2025 06:45 AM

जर तुम्हाला खरा आणि काळजी घेणारा जीवनसाथी मिळाला तर आयुष्य खूप सोपे होते. प्रेमाच्या या खऱ्या उदाहरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यामध्ये एका वृद्ध पुरूषाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो आयसीयूमध्ये दाखल असलेल्या आपल्या पत्नीला प्रोत्साहन देत आहे. यासोबतच तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओवरून, वृद्ध पुरूषाचे वय ७५ वर्षांचे असल्याचे सांगितले जाते. तर महिलेचे वय ७० वर्षांचे आहे. इतक्या वयानंतरही दोघांमध्ये दिसणारे प्रेम आणि केमिस्ट्री अद्भुत आहे. ही घटना बिहारमधील भोजपूरची असल्याचे सांगितले जात आहे. या जोडप्याचा हृदयस्पर्शी भोजपूर व्हायरल व्हिडिओ श्याम द्विवेदी नावाच्या एका वापरकर्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केला आहे.

Viral: नेत्यानंतर सामान्य जनताही 'डान्सिंग कार' मध्ये! कॉलेजसमोर गाडीत जोडपं आक्षेपार्ह अवस्थेत दिसलं, व्हिडिओ व्हायरल

यासोबतच कॅप्शनमध्ये माहिती देताना लिहिले आहे की, "असं प्रेम.... पत्नी आयसीयूमध्ये, पतीने तिचा हात धरला - मी इथे आहे . भोजपूर रुग्णालयातून भावनिक व्हिडिओ समोर आला आहे. पती ७५ वर्षांचा आहे, पत्नी ७० वर्षांची आहे." व्हिडिओमध्येअसे दिसून येते की, वृद्ध माणूस आपल्या आजारी पत्नीचा हात धरून तिला सर्व काही ठीक होईल. मी इथे आहे असे सांगून प्रोत्साहन देत आहे. आजारी पत्नीला पाहून बाबा खूप भावुक झाले आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये डॉक्टरांचे एक विधान देखील आहे. ज्यामध्ये ते सांगत आहेत की, वृद्ध महिलेची तब्येत खूप खराब होती. त्यामुळे तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. जेव्हा वृद्धाने महिलेला जीवन आणि मृत्यूची लढाई लढताना पाहिले तेव्हा तो खूप भावुक झाला. त्याने पत्नीचा हात धरून तिला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ खऱ्या प्रेमाचे जिवंत उदाहरण आहे. वापरकर्त्यांकडून याला खूप पसंती मिळत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.