<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">पुणे: पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात हॉस्पिटल्सची साखळी असलेला सह्याद्री ग्रुपचा ताबा आता मणिपाल ग्रुपकडे जाणार आहे. मणिपाल हेल्थ एन्टरप्रायजेस कंपनीने तब्बल सहा हजार चारशे कोटी रुपयांची बोली लावून सह्याद्री हॉस्पिटलाचा ताबा मिळवला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि कराड या ठिकाणी मिळून सह्याद्री ग्रुपची अकरा हॉस्पिटल्स आहेत. ज्यामध्ये तेराशे बेड्स, अडीच हजार आरोग्य कर्मचारी आणि साडेतीन हजार सपोर्ट स्टाफ काम करतो. सह्याद्री हॉस्पिटल्सच्या साखळीचा ताबा आतापर्यंत कॅनडाच्या ऑंटीरिओ टीचर्स पेन्शन प्लॅन या कंपनीकडे होता. कॅनडाच्या या कंपनीने 2022 मध्ये अडीच हजार कोटी रुपये मोजून सह्याद्री हॉस्पिटल्सचा एव्हरस्टोन या कंपनीकडून मिळवला होता.
तीन वर्षांनी सहा हजार चारशे कोटींना सह्याद्री हॉस्पिटलाचा ताबा मणिपालकडे देताना कॅनडाच्या या कंपनीला दुपटीहून अधिक परतावा मिळणार आहे. 2019 ला सह्याद्री हॉस्पिटलची स्थापना करणाऱ्या डॉक्टर चारुदत्त आपटे यांच्याकडील हॉस्पिटल्सचा ताबा एक हजार कोटी रुपये मोजून एव्हरस्टोन कंपनीने मिळवला होता. यातून आरोग्य क्षेत्रात खाजगी कंपन्यांचा प्रभाव किती वेगाने वाढतोय हे दिसून येतं आहे. मणिपाल हॉस्पिटल हा भारतातील दुसरा मोठा आरोग्य क्षेत्रातील समूह असून देशाच्या विविध शहरांमध्ये मिळून या समूहाची बारा हजार बेड्स आहेत. सह्याद्री हॉस्पिटलल्सची नोंदणी धर्मादाय हॉस्पिटल्स म्हणून असली तरी खाजगी कंपन्यांकडे ताबा गेल्याने 2019 पासून धर्मादाय आयुक्तालयाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करणं हॉस्पिटलससाठी बंधनकारक राहत नाही. सामान्य नागरिकांना मात्र यामुळं आरोग्यसेवा आणखी महाग होण्याची भीती आहे.
मणिपाल हेल्थ एन्टरप्रायजेस कंपनीने तब्बल सहा हजार चारशे कोटी रुपयांची बोली लावून सह्याद्री हॉस्पिटलाचा ताबा मिळवला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि कराड या ठिकाणी मिळून सह्याद्री ग्रुपची अकरा हॉस्पिटल्स आहेत. ज्यामध्ये तेराशे बेड्स, अडीच हजार आरोग्य कर्मचारी आणि साडेतीन हजार सपोर्ट स्टाफ काम करतो. सह्याद्री हॉस्पिटल्स ही महाराष्ट्रातील अग्रगण्य खासगी रुग्णालय साखळी असून, पुणे, नाशिक, कराड, कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये हॉस्पिटल्स आहे. OTPP या कॅनडास्थित निधी संस्थेने 2019 मध्ये सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये गुंतवणूक केली होती. चार वर्षांनंतर त्यांनी आपला हिस्सा मणिपाल समूहाला विकला आहे.
2019 ला सह्याद्री हॉस्पिटलची स्थापना करणाऱ्या डॉक्टर चारुदत्त आपटे राधिका आपटेचे वडील आहेत. राधिकाचा जन्म 7 सप्टेंबर 1985 रोजी झाला आणि तिचं बालपण पुण्यात गेलं. त्यांचे वडील डॉ. चारुदत्त आपटे हे एक प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत.