अनेकदा बँक खात्यातील सर्वच पैसे संपवले तर बँका चार्ज लावत असतात. परंतू आता सेव्हींग अकाऊंट्सच्या कस्टमरना चिंता करण्याची काही गरज नाही. आता एसबीआय सह सहा मोठ्या बँकांनी मिनिमम बॅलन्स चार्ज संपूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात काही शिल्लक नसले तरी कोणताही चार्ज कापला जाणार नाही. चला तर जाणून घेऊया कोणत्या बँकांनी आता मिनिमम बॅलन्स चार्जना समाप्त केला आहे.
1-बँक ऑफ बडोदाबँक ऑफ बडोदाने स्टँडर्ड सेव्हींग्स अकाऊंटवर मिनिमम बॅलन्सच्या अटीची पूर्तता केल्यानंतर लागणाऱ्या चार्जना १ जुलै २०२५ पासून समाप्त केला आहे. मात्र, प्रिमीयम सेव्हींग्स अकाऊंट स्कीम्सवर हा चार्ज समाप्त केलेला नाही.
2-इंडियन बँकइंडियन बँकने देखील त्यांच्या मिनिमम बॅलन्स चार्जना संपूर्णपणे समाप्त करण्याची घोषणा केली आहे, सर्वप्रकारच्या सेव्हींग्स अकाऊंटवर ७ जुलै २०२५ पासून एव्हरेज मिनिमम बॅलन्स चार्ज समाप्त करण्यात आला आहे.
3-कॅनरा बँककॅनरा बँकने मे महिन्यातच रेग्युलर सेव्हींग्स अकाऊंटसह सर्व प्रकारच्या सेव्हींग्स अकाऊंटवर लावण्यात येणारा मिनिमम बँलन्स चार्जला समाप्त केले आहे. यात सॅलरी आणि एनआरआय सेव्हींग्स अकाऊंटचा देखील समावेश आहे.
4-पीएनबीपंजाब नॅशनल बँकने देखील त्यांच्या कस्टमरना दिलासा देण्यासाठी सर्व प्रकारच्या सेव्हींग्स अकाऊंटवर मिनिमम एव्हरेज बँलन्स चार्जला समाप्त केले आहे.
5-स्टेट बँक ऑफ इंडियासाल 2020 पासूनच एव्हरेज मिनिमम बॅलन्स चार्ज करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आता हा चार्ज समाप्त केला आहे. म्हणजे आता सेव्हींग्स अकाऊंटवर मिनिमम बॅलन्सच्या अटी पूर्ण न करणाऱ्यांवर कोणताही चार्ज न लावण्याचा निर्णय घेतला आहे.
6- बँक ऑफ बडोदाबँक ऑफ बडोदाने देखील मिनिमम बँलन्सच्या अटींना पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांना आता कोणताही चार्ज कस्टमर्सकडून न घेण्याचा निर्णय घेतला आहे. बँक ऑफ इंडियाच्या प्रेस रिलीजनुसार आता हा बदल बाजारातील बदलती परिस्थिती आणिवित्तीयलवचिकता वाढवण्याच्या उद्देश्याने केला आहे.