भारतातील सर्वात श्रीमंत धाबा: आजच्या काळात हॉटेल (Hotel) व्यवसाय हा सर्वात जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय ठरत आहे. तुमच्याकडे जर योग्य क्वालिटी आणि क्वांटीटी असेल तर ग्राहक लांबून देखील तुमच्या हॉटेलमध्ये येतात. पण तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा कोणता आहे? याबाबतच माहिती आहे का? तर हरियाणातील (Haryana) मुर्थल येथे असलेला ‘अमरिक सुखदेव ढाबा’ आज फक्त एक ढाबा नाही तर एक ब्रँड बनला आहे. जिथे फक्त ट्रक ड्रायव्हर्स थांबायचे, पण आज दिल्ली-एनसीआरमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या हजारो लोकांची ती पहिली पसंती आहे. प्रत्येक महिन्याला या ढाब्याची 8 कोटी रुपयांची कमाई होत आहे.
कोणत्याही टीव्ही जाहिरातीशिवाय, सोशल मीडिया प्रमोशनशिवाय किंवा सेलिब्रिटींच्या समर्थनाशिवाय, हा ढाबा दरमहा सुमारे महिन्याला 8 कोटी रुपये कमावतो. इतकेच नाही तर तो भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा देखील आहे. बटाट्याचे पराठे वाढवून, अमरिक सुखदेव ढाबा दरवर्षी अब्जावधी कमावतो.
मरिक सुखदेव यांच्या यांच्या ढाब्यावर एका वेळी जेवणासाठी 600 लोक बसू शकतात. तर प्रत्येक 45 मिनिटानंतर प्रत्येक टेबलवर नवीन ग्राहक येतात. त्यानुसार, एका दिवसात सुमारे 9000 ग्राहक येथे जेवण करतात. जर प्रत्येक व्यक्तीने सरासरी 300 रुपये खर्च केले तर दररोजची कमाई सुमारे 27 लाख रुपये होते.
अमरिक सुखदेव ढाबा 1956 मध्ये सरदार प्रकाश सिंग यांनी सुरू केला होता. त्यावेळी तो फक्त ट्रक चालकांसाठी होता, परंतु जसजसा दर्जा, स्वच्छता आणि सेवा सुधारत गेली तसतसे त्याचे नाव वाढत गेले. आज त्यांचे पुत्र अमरिक आणि सुखदेव हा व्यवसाय सांभाळत आहेत. ढाब्याकडे स्वतःची जमीन आहे, त्यामुळे भाडे खर्च नाही. येथे 500 हून अधिक कर्मचारी काम करतात. एका कर्मचाऱ्याचा सरासरी पगार 25000 रुपये आहे, ज्यामुळे एकूण कर्मचाऱ्यांचा खर्च सुमारे 5 ते 6 टक्के आहे.
एका अहवालानुसार, अमरिक सुखदेवला जगातील ‘टॉप लेजेंडरी रेस्टॉरंट्स’च्या यादीतही स्थान मिळाले आहे. भारतातील हा एकमेव ढाबा आहे ज्याला कोणत्याही फॅन्सी ब्रँडिंगशिवाय इतकी ओळख मिळाली आहे.
या ढाब्यामधील सर्वात मोठी खासियत म्हणजे येथील जेवण, मसालेदार बटाट्याचे पराठे, स्वच्छ सजवलेले बसण्याची जागा आणि वेळेवर सेवा. तुम्ही कुटुंबासह असाल किंवा मित्रांसोबत, हे ठिकाण सर्वांना आकर्षित करते.
अलीकडेच, रॉकी सग्गु कॅपिटल नावाच्या एका इंस्टाग्राम क्रिएटरने अमरिक सुखदेवच्या प्रवासावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो रिअल इस्टेट आणि व्यवसायाशी संबंधित माहिती शेअर करतो. त्याने या प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या बिझनेस मॉडेलबद्दल सांगितले आणि काही आकडे देखील शेअर केले जे कदाचित कोणालाही माहित नसतील. त्याच्या मते, आज हे रेस्टॉरंट दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपये कमावते.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा