मीन राशीसाठी शुक्रवार शुभ राहील. मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. जुने वाद मिटू शकतात. कुटुंबात सौहार्दाचे वातावरण राहील. शुभ रंग: हलका हिरवा. लकी नंबर : 7. उपाय: तुळशीसमोर दिवा लावा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)
धनु : दिवसाच्या पहिल्या काही तासांसाठी चंद्र तुमच्या राशीत असेल. त्यानंतर तो रास बदल करणार आहे. शुक्रवारी धनु राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. रखडलेली कामं मार्गी लागतील. शुभ रंग : पिवळा. शुभ क्रमांक: 3. भगवान विष्णूला केळी अर्पण करा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)
11 जुलै 2025, शुक्रवार हा विशेष दिवस आहे. शुक्रवारी वैधृती योग तयार होत आहे. शुक्रवारी प्रतिपदा तिथी आहे. शुक्रवार अनेक राशींसाठी फलदायी ठरु शकतो. शुक्रवारी पूर्वाषाढा नक्षत्राचा योग जुळून आला आहे. शुक्रवारी कोणत्या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल? हे जाणून घेऊयात. शुक्रवारी चंद्र धनु आणि मकर राशीत असणार आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)
वृषभ : शुक्रदेवाच्या आशीर्वादामुळे शुक्रवारी वृषभ राशीच्या लोकांना सुख प्राप्त होईल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. संपत्तीतून फायदा होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीसाठी गुलाबी रंग भाग्यवान असणार आहे. तर 6 हा लकी नंबर ठरु शकतो. लक्ष्मी देवीला पांढरे फुले अर्पण करा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)
मकर : चंद्र मकर राशीत असणार आहे. मकर राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. ऑफीस/कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. शुभ रंग: राखाडी. शुभ क्रमांक: 8. उपाय: संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)
कर्क : कर्क राशीच्या लोकांचं ऑफीसमध्ये/कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकतं. जॉबबाबत नवी संधी उपलब्ध होतील. वैवाहिक आयुष्यात आनंद राहिली. शुभ रंग : चांदी कलर. लकी नंबर : 2. उपाय : तांदूळ दान करा. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)