‘बालभारती’ची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाल्यामुळे तातडीने पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली. पुणे येथील बालभारती कार्यालयाची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारत बांधण्यासंदर्भात सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता, त्यास राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी उत्तर दिले. यात सदस्य जगन्नाथ अभ्यंकर, विक्रम काळे, किशोर दराडे यांनी सहभाग घेतला.
खासदार निलेश लंके उपोषण करणारखासदार निलेश लंके आजपासून (शुक्रवार) अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामाचे टेंडर होऊन देखील काम सुरू न झाल्याने त्यांनी उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
निकेत कौशिक यांनी पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारलामधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर मिरा भाईंदर वसई विरारचे पोलिस आयुक्त म्हणून निकेत कौशिक यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त संदिप डोईफोडे,अशोक विरकर, प्रकाश गायकवाड व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस दल, या भागातील नागरिक आणि रहिवाशांचे जीवन, स्वातंत्र्य आणि कायदेशीर हितसंबंधांचे रक्षण करण्यास वचनबद्ध आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रिदवाक्यानुसार चांगल्या गोष्टींचे रक्षण करण्यासाठी आणि गुन्हेगारी घटकांना आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी स्थापित नियम आणि कायदे काटेकोरपणे पालन करावे. सामूहिक प्रयत्नांद्वारे मीरा-भाईंदर, वसई-विरारमध्ये शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखू आणि ते एक आनंदी आणि समृद्ध समुदाय बनवू याची आम्हाला खात्री आहे अशी प्रतिक्रिया कौशिक यांनी यावेळी व्यक्त केली.
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, चार जणांना मृत्यूमुंबई नाशिक महामार्गावर मुंढेगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. कंटेनरच चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर चारचाकीवर पलटी झाल्याने चार जणांना जागेची मृत्यू झाला. कंटेनर खाली गाडी दबल्याने दोन महिला आणि दोन पुरुष प्रवाशांचा मृत्यू झाला.अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व मुबंईच्या अंधेरीमधील होते. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.