तुमच्यापैकी अनेकजणांनी आरोग्य विमा घेतलेला असेल. तुम्ही आजारी पडलात किंवा एखादी सर्जरी करायची असेल तर तुम्हाला आरोग्यविम्याचा फायदा होत असतो. गेल्या काही काही काळात वैद्यकीय शास्त्रात प्रगती झाल्याने अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार खूप कमी वेळात पूर्ण होत असल्याचे समोर आले आहे. पूर्वी रुग्णांना काही दिवस रुग्णालयात रहावे लागत असे, मात्र आता लॅप्रोस्कोपी, लेसर शस्त्रक्रियेमुळे अवघ्या काही तासांत उपचार केले जातात.
प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे काही तासांत उपचार केले जातात. त्यामुळे आता आरोग्य विमा कंपन्यांनी आपले नियम बदलले आहेत. त्यामुळे आता तुम्ही कोणत्याही आजारावर केवळ दोन तास जरी उपचार घेतले असतील तरीही तुम्ही विम्याचा लाभ घेऊ शकता.
वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, केमोथेरपी, अँजिओग्राफी या सर्जरी अवघ्या काही तासांत पूर्ण केल्या जातात. यापूर्वी रुग्णांला अनेक दिवस रुग्णालयात दाखल करावे लागत होते, मात्र आता लवकर उपचार शक्य असल्याने रुग्णांना लवकर डिस्चार्ज मिळतोच, आणि खर्चही कमी येतो.
आरोग्य विम्याच्या नियमात बदल
Policybazaar.com या कंपनीच्या आरोग्य विमा विभागाचे प्रमुख सिद्धार्थ सिंघल यांनी सांगितले की, ‘आता विमा कंपन्यांनी कमी काळाच्या उपचारांनाही कव्हर देण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी कमी काळ उपचार घेणाऱ्या रुग्णांना विमा मिळत नसे, मात्र आता अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या नियमांमध्ये बदल केला आहे.’
आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा
वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचार पद्धती पूर्णपणे बदलली आहे. लॅपरोस्कोपी, लेसर शस्त्रक्रिया अवघ्या काही तासांमध्ये पू्र्ण होते. तसेच रुग्णांना त्रासही कमी होतो, आणि रुग्ण कमी कालावधीत बरा होतो. यामुळे विमा कंपन्यांनी आता त्यांचे नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे.
विमा धारकांना थेट फायदा
विमा कंपन्यांनी बदललेल्या नियमांचा थेट फायदा सामान्य जनतेला मिळतं आहे. पूर्वी लहान उपचारांसाठी फायदा मिळत नसल्याचे रुग्णांना त्रासाचा सामना करावा लागत होतास मात्र आता नियम बदलल्याने बऱ्याच लोकांना फायदा होते आहे, आणि त्यांनी वैद्यकीय खर्चातून मुक्तता होत आहे.