इराण अणूबॉम्ब बनवणार यावरुन मध्य पूर्वेत सुरु असलेला वादंग अजून थांबलेला नसताना आता युरोपात यावरुन नवीन चर्चा सुरु झाली आहे. असे IAEA चे प्रमुख राफेल ग्रॉसी यांच्या एका वक्तव्यावरुन सुरु झाले आहे. वास्तविक ग्रॉसी म्हणाले की जर जर्मनीची इच्छा असेल तर एका महिन्यात वा त्याहून अधिक काळात ते अणूबॉम्ब तयार करु शकतात.बुधवारी प्रकाशित झालेले पॉलीश आऊटलेट रेक्जपोस्पोलिटा बरोबर मुलाखतीत ग्रॉसी यांनी सांगितले की जर्मनीकडे आवश्यक न्युक्लिअर मटेरिअल, माहीती आणि तंत्रज्ञान आहे.
जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी जर्मनीला युरोपातील सर्वात मोठी सैन्य शक्ती बनवण्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रॉसी यांनी हे वक्तव्य केल्याने याकडे गांभीर्याने पाहीले जात आहे. ग्रॉसी यांच्या मते जर्मनी अणूबॉम्बची निर्मिती करु शकतो, त्याच्याकडे सर्व सामुग्री आहे. परंतू तो आण्विक अप्रसार करारात सहभागी असून त्याने त्याबद्दल आपली प्रतिबद्धताही सिद्ध केली आहे.
जर्मनीचे चान्सलर फ्रेडमिक मर्ज यांच्या आधी बुंडेस्टागमध्ये सीडीयू /एसयू ब्लॉकचे प्रमुख जेन्स स्पॅन यांनी जर्मनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले होते की जर्मनीत तैनात अमेरिकन आण्विक शस्रास्रे रशियापासूनच्या धोक्याला रोखण्यासाठी पर्याप्त नाहीत. अशात जर्मनीला ब्रिटन किंवा फ्रान्सच्या आण्विक शस्रगारापर्यंत पोहचायला हवे, वा व्यापक युरोपीय निवारक तंत्र बनवावे लागेल. ते म्हणाले होते की जर्मनीची अमेरिकन शस्रास्रांवर जादा निर्भरता योग्य नाही. त्यांनी एक स्वतंत्र आण्विक सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जर्मनीला आण्विक शस्रास्रांपर्यंत पोहच असेल.
ग्रॉसी म्हणाले की कोणताही देश केवळ परोपकाराने प्रेरित नाही. त्यांनी पुढे सांगितले की युरोपीय सरकाराने हे निश्चित करावे की असे जग आणखी धोकादायक असेल जेथे आण्विक शस्रास्रे सहज उपलब्ध होतील. आयएईए प्रमुखाने सांगितले की सुरक्षेवर आंतरराष्ट्रीय संवादाची गरज आहे आणि अण्वस्त्र प्रसारबंदी कराराच्या वचनबद्धतेला महत्त्व देण्यावर त्यांनी भर दिला आहे.
इराण संदर्भात ग्रॉसी यांनी सांगितले की इस्राईलशी संघर्षानंतर इराणने IAEA सोबतचा संबंध तोडून ठाकले आहेत. निरीक्षकांना देशाबाहेर टाकले आहे. राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. आणि एजन्सीवर टीका केली आहे.परंतू असे नाही. इराणमध्ये संवर्धित युरेनियम कुठे आहे हे वास्तविक आम्हाला माहीती नाही.