अंत्यसंस्कार चालू असल्याने लोक रडत होते, तेवढ्यात आकाशातून पैशांचा पाऊस झाला, लोक आनंदाने वेडे झाले
GH News July 11, 2025 11:06 PM

एखाद्या प्रिय व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार चालू आहेत. लोक दु:खद अंतकरणाने या व्यक्तीला शेवटचा निरोप देत आहेत. मृतव्यक्तीचे आप्त हमसून हमसून रडत आहेत. सगळा माहोल दु:खाने भरलेला आहे. आणि अचानक आकाशातून नोटा पडायला लागल्या तर काय होईल. तुम्ही अशा वेळी काय कराल ? नोटांना उचलाल ना ? असाच प्रकार एके ठिकाणी घडला आहे. लोक दु:ख विसरुन नोटा उचलू लागले आणि आनंदाने घरी गेले.

अमेरिकेच्या डेट्रॉयट शहरात एका व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरु होते. लोक रडत होते. जवळचे नातेवाईकांचा तर अश्रूंचा बांध फुटला होता. तेव्हा अचानक आकाशातून नोटा पडू लागल्या. त्यानंतर जे लोक इतका वेळ रडत बसले होते ते नोटा उचलून खिशात कोंबू लागले.घरी जाताना त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

चित्रपटात तुम्ही नेहमीच नोटांची बरसात पाहीली असेल परंतू अमेरिकेच्या डेट्रॉयट शहरातील ग्रेटियट एवेन्यू कॉनर्र स्ट्रीटवर असे प्रत्यक्षात घडले. वास्तविक येथे कारवॉशचे मालक डेरेल थॉमस यांना शेवटचा निरोप दिला जात होता. त्यांच्या अंत्यसंस्काराला खूप सारे लोक जमले होते. तेव्हा अचानक हॅलिकॉप्टरमधून गुलाबांच्या पाकळ्यांसह नोटांचा पाऊस पडला..

४ लाख ३० हजारांचा पाऊस

डेरेल थॉमस ५८ वर्षांचे होते आणि एक कारवॉश कंपनी चालवायचे. त्यांना अल्जायमर झाला होता. त्यांनी मरण्यापूर्वी एक इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या अंत्यसंस्कार चालू असताना नोटांचा पाऊस पाडायचा अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळे त्यांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा एक हॅलिकॉप्टर मागवण्यात आले आणि त्यातून नोटांचा पाऊस पाडण्यात आला.सुमारे ५ हजार डॉलरच्या नोटा खाली टाकण्यात आल्या.भारतीय मुल्यात ही रक्कम ४ लाख ३० हजार रुपये होते.

ट्रॅफीक थांबले, पैसे घेण्यासाठी झुंबड

आश्चर्याची गोष्ट म्हणजे पैशांचा पाऊस जसा सुरु झाला तसेच मयताला आलेले दुखी आणि कष्टी लोक अचानक आनंदी झाले आणि नोटा गोळा करु लागले. काही लोकांमध्ये मारामारी देखील झाली. रस्त्यावर ट्रॅफीक जाम झाले.लोकांनी त्यांच्या कारमधून उतरुन या नोटांना पकडले. पोलिसांनी यासंदर्भात आपल्याकडे केवळ गुलाबवृष्टी करणार असे सांगून परवानगी मागितली होती असे म्हटले आहे. डेरेल याचा मुलगा स्मोक यांनी द सन या वृत्तपत्राला सांगितले की त्यांच्या वडीलांच्या इच्छा होती की रस्त्यावर पैशांचा पाऊस पाडून आपल्या समुदायाला काही पैसे परत केले. डेरेल यांची भाची क्रिस्टल पेरी यांनी सांगितले की एकूण ५,००० डॉलरचा दानधर्म करण्यात आला.त्यांच्या मुलाने देखील काही पैसे दान केले.

लोक म्हणाले खूपच छान वाटले

आकाशातून पैशांचा पाऊस झाल्यानंतर कारवॉश कंपनीचा एक कर्मचारी लिसा यांनी सांगितले की सर्वांना काही काही पैसे मिळाले. पैसे घेण्यासाठी लोक धावले. परंतू भांडणं काही झाली नाहीत. याआधी पाकिस्तानात अशा प्रकारची घटना घडली होती. तेथे एका व्यक्तीने त्याच्या मुलाच्या लग्नात अशाच प्रकारे पैशांचा पाऊस पाडला होता. हा प्रकार पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांताच्या हैदराबाद शहरात घडला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.