जगातील अनेक देश लोकसंख्या वाढीचा दर घटल्याने त्रस्त आहेत. त्यामुळे बहुतांशी देशांनी लोकसंख्या वाढवण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. अशातच आता 82 टक्के हिंदू लोकसंख्या असलेल्या नेपाळ देशाने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर केले आहे. याअंतर्गत नेपाळमधील जोडप्यांना आता 3 मुले जन्माला घालावी लागणार आहेत. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी ही घोषणा केली आहे.
नेपाळ हा भारताचा शेजारील देश देखील आहे. सरकारी आकडेवारीनुसार, नेपाळची लोकसंख्या 2.97 कोटी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून नेपाळमधील जन्मदर घटला आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीसाठी सरकारने हे धोरण जाहीर केले आहे. पंतप्रधान ओली यांनी सांगितले की, ‘जर हे धोरण लागू केले नाही तर भविष्यात संकट आणखी वाढेल.’
पंतप्रधान ओली यांनी काय म्हटलं?
लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान ओली यांनी म्हटले की, ‘आम्ही आधी एक मूल जन्माला घालण्याचे आवाहन केले होते, मात्र याबाबत लोकांचा गैरसमज झाला. आता बरेल लोक लग्न करण्याच्ा आणि मूल जन्माला घालण्याच्या विरोधात आहेत, मात्र यामुळे देशाचा विकास थांबेल. आता लग्नासाठी किमान वय 20 वर्षे करण्यात आले आहे. मी तरुणांना सांगू इच्छितो की तुम्ही 20 ते 20 वर्षांच्या दरम्यान लग्न करा. लग्नाला जास्त उशीर झाला तर देशाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो.
पुढे बोलताना पंतप्रधान ओली म्हणाले की, सरकारने 3 मुले जन्माला घालण्याचे धोरण लागू केले आहे. लोकांनी ते अंमलात आणले पाहिजे. कारण फक्त तरुणच देशाचा विकास करू शकतात. त्यामुळे आम्ही लवकरच यावर कठोर कायदा तयार करणार आहे. मानवी संस्कृतीसाठी जन्म महत्त्वाचा आहे. जर संस्कृती वाचवायची असेल तर जन्मदर वाढवण्याके लक्ष देणे गरजेचे आहे.
नेपाळच्या जन्मदरात घट
भारताच्या शेजारील देश नेपाळची लोकसंख्या 3 कोटींच्या जवळ आहे, मात्र जन्मदर घटला आहे. 2022 मध्ये नेपाळचा जन्मदर 19.64 होता, जो 2025 मध्ये 17 पर्यंत खाली आला आहे. त्याचबरोबर 2013 मध्ये नेपाळचा प्रजनन दर 2.36 होता, जो 2023 मध्ये 1.98 पर्यंत कमी झाला. यामुळे नेपाळने 3 मुलांना जन्म देण्याचे धोरण आणले आहे.