मुंबई : जगातील नामांकित इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आता भारतात पाऊल ठेवण्यास सज्ज आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार टेस्ला 15 जुलै रोजी मुंबईत त्यांचं पहिलं शोरुम सुरु करणार आहे. हे शोरुम एक्सपिरियन्स सेंटर असेल, जिथं लोक टेस्लाच्या गाड्या पाहू शकतात, टेस्ट ड्राइव्ह करु शकतात. भारतात वेगानं वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजाराच्या पार्श्वभूमीवर टेस्लाचा प्रवेश महत्त्वाचा असेल.
टेस्लाचं पहिलं शोरुम मुंबईत सुरु होईल. हे शोरुम कंपनीनं प्रिमियम ठिकाणी भाडेतत्त्वावर घेतलं आहे. या ठिकाणी कार ग्राहकांना दाखवल्या जाणार नाहीत तर, याला प्रिमियम एक्सपिरियन्स सेंटरच्या रुपात तयार करण्यात आलं आहे. इथं ग्राहक टेस्लाचं तंत्रज्ञान जवळून समजून घेऊ शकतील. या शोरुममध्ये ग्राहक टेस्लाच्या गाड्या पाहू शकतात,इंटरएक्टिव्ह डिस्प्ले आणि तंत्रज्ञानासंदर्भात माहिती घेतील. कारची टेस्ट ड्राइव्ह देखील घेऊ शकतात. टेस्लाच्या चार्जिंग टेक्नोलॉजी आणि इनोवेशनचा डेमो देखील पाहू शकतात.
टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या नेतृत्त्वात कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून भारतात पाऊल ठेवण्याची तयारी करत होती. मार्च 2025 मध्ये टेस्लानं मुंबईत शोरुमसाठी जागा निश्चित केली होती. त्यानंतर कंपनीनं भारतात नव्या कर्मचाऱ्यांची भरती सुरु केली होती. आता टेस्ला नवी दिल्ली आणि इतर शहरांमध्ये जागांचा शोध घेत आहे. ज्यामुळं भारतात वेगात नेटवर्क वाढवता येईल.
टेस्लाच्या भारतातील प्रवेशानं ईलेक्ट्रिक कारच्या बाजारात स्पर्धा सुरु होईल. भारतात टाटा, महिंद्रा, एमजी आणि बीवायडी सारख्या कंपन्या कार्यरत होत्या. टेस्लाच्या भारतातील प्रवेशानं जागतिक ब्रँडचं तंत्रज्ञान, स्टाईल आणि परफॉर्मन्स यासारख्या नव्या गोष्टी पाहायला मिळतील. यामुळं ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनं ग्राहकांना स्वस्त आणि किफायतशीर दरात मिळतील. याशिवाय त्यांना प्रिमियम आणि स्मार्ट पर्याय देकील मिळेल. टेस्लाच्या प्रवेशानं भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचं माार्केट वेगानं वाढणार आहे.
आणखी वाचा