असं एक गाव जिथे पुरुषांना नो एन्ट्री, फक्त महिलांचं राज्य, तरीही होतात प्रेग्नेंट
GH News July 13, 2025 10:07 PM

आपण अनेकदा स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतो, मात्र अनेक स्त्रीयांच्या वाट्याला ही समानता, पुरुषाला मिळणारं स्वातंत्र्य येतचं असं नाही. अनेक देशांमध्ये अशा काही विचित्र प्रथा पंरपरा आहेत, ज्या प्रथा परंपरांमुळे तेथील स्त्रीया भरडल्या जातात, त्याच्या वाट्याला कायम दु:खच येतं. मात्र त्यानंतर अशा देखील काही घटना घडतात या स्त्रीया सर्वांमधून उसळी घेतात आणि समाजाविरोधात बंड करत आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करतात. पुरुषप्रधान व्यवस्थेला नाकारतात, अशाच एका गावाची कथा आज आपण जाणून घेणार आहोत.

या गावामध्ये एकही पुरुष नाही, सर्व महिलाच राहतात, त्या गावाचं संपूर्ण व्यवस्थापन या महिलाच करतात. या गावाची प्रमुख देखील महिलाच आहे. इथे फक्त महिलांचा आदेश चालतो. या गावात पुरुषांना येण्यास मनाई आहे. या महिला इथे आपल्या मुलांसोबत राहतात, या सर्व महिला एकल पालक आहेत, त्या आपल्या मुलाच्या पालपोषणाची जबाबदारी स्वत: घेतात.

हे गाव आफ्रिका खंडातील केनिया देशात आहे. उमोजा असं या गावाचं नाव आहे. या गावामध्ये सर्व अशाच महिला राहातात ज्यांचं शोषण झालं आहे, ज्या महिला पुरुषांच्या अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे. या गावात पुरुषांना येण्यास सक्त मनाई आहे, गावाच्या सुरक्षेसाठी चारही बाजुनं काट्याचं कुंपण लावलं आहे. 1990 पर्यंत या भागांमध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटश राजवटीमधील अधिकारी या भागातील महिलांना प्रचंड त्रास द्यायचे, त्यांच्यावर बलात्कार करायचे त्यांचा छळ कारायचे, ब्रिटिशांविरोधात बंड करून उठलेल्या महिलांनी या गावाची त्यावेळी स्थापना केली, त्यावेळी या गावात फक्त वीस महिला राहात होत्या, आता या गावात शेकडो महिला राहतात.

विशेष म्हणजे या गावात एकही पुरुष नसताना येथील महिला प्रेग्नेंट होतात, या महिला रात्री अंधारामध्ये लपून -छपून गावाच्या बाहेर पडतात आणि आपल्या प्रियकराला किंवा आवडत्या व्यक्तीला भेटतात. मात्र त्याला या गावात प्रवेश करण्याची परवानगी नसते. या महिला मुलांना जन्म देतात, मुलगी झाली तर कायमस्वरूपी ती आपल्या आईजवळ राहते आणि मुलगा झाला तर त्याला 18 वर्षांनंतर हे गाव सोडावं लागतं, या महिला कधीही आपल्या मुलांना त्यांच्या वडिलांचं नाव सांगत नाहीत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.