ENG vs IND : लॉर्ड्समध्ये टीम इंडियाला टेन्शन! पंतनंतर आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे मैदानातून बाहेर
GH News July 14, 2025 12:06 AM

लॉर्डमसध्ये खेळवण्यात येत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याच्या दुखापतीमुळे टीम इंडिया अडचणीत आहे. त्यानंतर आता चौथ्या दिवशी वेगवान गोलंदाज आकाश दीप याला दुखापतीमुळे मैदानातून बाहेर जावं लागलं आहे. आकाशने चौथ्या दिवशी पहिल्या सत्राच्या शेवटी हॅरी ब्रूक याला बोल्ड करत इंग्लंडला चौथा झटका दिला. मात्र त्यानंतर आकाशला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. आता आकाशला झालेली दुखापत किती गंभीर आहे? याबाबत अजून काही माहिती मिळालेली नाही. मात्र आकाशला झालेली दुखापत भारतासाठी निश्चितच चांगली नाही.

ऋषभ पंतला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या जागी ध्रुव जुरेल विकेटकीपर म्हणून खेळत आहे. तर आकाश दीपला दुखापतीने ग्रासलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनसार, आकाशला लंगडत लंगडत मैदानाबाहेर जावं लागलं. आकाश सीमारेषेपार फिजीओसोबत बोलत होता. आकाशला तेव्हाही वेदना होत असल्याचं जाणवत होतं. आता आकाश दुखापतीमुळे दुसऱ्या डावात बॉलिंगसाठी पुन्हा येणार की नाही? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आकाशने पहिल्या सत्रात आयसीसी रँकिंगमधील नंबर 1 बॅट्समन बॅकरी ब्रूक याला क्लिन बोल्ड करत ड्रेसिंग रुमचा रस्ता दाखवला. तसेच आकाशने बर्मिंगहॅममध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत आकाशने 10 विकेट्स घेत टीम इंडियाच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली होती.

उपकर्णधार पंतला दुखापत

आकाशच्या आधी पंतला विकेटकीपिंग करताना दुखापत झाली. पंतने डाईव्ह मारुन बॉल रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात पंतच्या तर्जनीला बॉल लागून गेला. त्यामुळे पंतच्या तर्जनीला दुखापत झाली. त्यामुळे पंतला मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर पंतच्या जागी ध्रुव जुरेल जबाबदारीने विकेटकीपरची भूमिका सार्थपणे पार पाडत आहे.

इंग्लंडच्या 5 बाद 175 धावा

दरम्यान इंग्लंडने दुसऱ्या डावात दुसऱ्या सत्राचा खेळ संपेपर्यंत (टी ब्रेक) 52 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 175 धावा केल्या आहेत. इंग्लंडसाठी बेन स्टोक्स 27 आणि ख्रिस वोक्स 8 धावावर नाबाद आहेत. तर टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर आकाश दीप आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी 1-1 विकेट मिळवली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.