Brother Marry Sister: सख्या भावा – बहिणीचं लग्न… ऐकायलाच प्रचंड वेगळं वाटतं. पण एक असा देश आहे जिथे जुळ्या भावा – बहिणीचं परंपरेनुसार लग्न केलं जातं. ही सांस्कृतीक परंपरा दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या देशातील नाही तर, थायलंड येथील आहे. सांगायचं झालं तर, थायलंड, समृद्ध संस्कृती, सुंदर मंदिरे आणि अद्वितीय परंपरांसाठी ओळखला जाणारा देश आहे. देशातील परंपारा दुसऱ्या देशांमध्ये चर्चेचा विषय असतात. येथील एका परंपरेने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे, ज्यामध्ये जुळ्या भावा-बहिणींचं लग्न केलं जातं. हे ऐकायला कितीही विचित्र वाटत असलं तरी, स्थानिक समुदायांसाठी ते तितकेच पवित्र आणि महत्त्वाचे आहे. या परंपरेमागे बौद्ध श्रद्धा आणि भूतकाळातील जीवनाच्या कथा आहेत, ज्यामुळे ती आणखी रंजक बनते.
थायलंडमधील काही समुदायांमध्ये, विशेषतः समुत प्राकानसारख्या भागात, असा विश्वास आहे की जर जुळी मुले एकाच आईपासून जन्मलेले भाऊ आणि बहीण असतील तर ते मागील जन्मात प्रेमी होते. बौद्ध धर्माच्या सिद्धांतानुसार, मागच्या जन्मात काही कार्य राहिलं असेल तर जुळ्या भावा – बहिणीचा जन्म होतो.
असं देखील मानलं जातं की, जर या मुलांचं लग्न प्रतीकात्मक समारंभात केलं नाही तर, त्यांचे जीवन अपयश, आजार किंवा अशांततेने भरलेलं असू शकते. म्हणूनच, जुळी मुले 6 ते 8 वर्षांची होताच, त्यांचे आई – वडील एका भव्य समारंभात त्यांचं लग्न लावून देतात.
या अनोख्या लग्नात सामान्य थाई लग्नात होणाऱ्या सर्व पारंपारिक विधींचा समावेश आहे. या सोहळ्यात मुलाला नव्या नवऱ्याप्रमाणे सजवण्यात येतं. नवऱ्या मुलाला जवळपास 5 लाख रुपयांचे दागिने देण्याची रित आहे. तर मुलीला वधूचा पोशाख घातला जातो आणि समारंभात पारंपारिक नृत्य, संगीत आणि मेजवानी समाविष्ट आहे. मुलांचे आई – वडीलच त्यांचे सासू – सासरे देखील होतात.
मोठ्या थाटात भावा – बहिणीचं लग्न केलं जातं. ज्याला सांस्कृतिकदृष्ट्या फार महत्त्व आहे, परंतु असं लग्न कायदेशीरदृष्ट्या वैध नाही. थायलंडच्या कौटुंबिक कायद्यानुसार, (Thai Family Law) भावंडांमध्ये किंवा जवळच्या रक्ताच्या नात्यातील विवाह प्रतिबंधित आहे. हे लग्न केवळ एक प्रतीकात्मक विधी आहे, ज्याचा उद्देश मुलांचं भविष्य आनंदी आणि समृद्ध करणं आहे.
लग्न सोहळा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मुलं त्यांचं आयुष्या सामान्य मुलांप्रमाणे जगण्यास सुरुवात करतात. त्यानंतर लग्नाचं वय झाल्यानंतर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करतात. या परंपरेत हुंड्याला थाई भाषेत ‘सिन सॉड’ असं म्हणतात.