एकनाथ शिंदेंना दे धक्का; शिवसेनेचे राज्य प्रवक्ते अजितदादांच्या राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हाती घेण
Marathi July 14, 2025 08:25 PM

रायगाद बातम्या: रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा वाद तटकरे आणि गोगावले या दोघांमध्ये सुरु असतानाच रायगड जिल्ह्यात मोठ्या कुरघोडी होताना पाहायला मिळत आहेत. एकमेकांना शह देण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते कोणतीही संधी सोडत नाहीत. त्यातच आता मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Faction) ताब्यात असलेल्या माणगाव नगरपंचायतीला सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मोठा सुरुंग लावल्याचं पाहायला मिळत आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजीव साबळे (Rajiv Sable) हे माणगाव नगरपंचायतीच्या माजी नगरसेवकांसह शिवसेना शिंदे गटाची साथ सोडणार असून येत्या 2 ऑगस्ट रोजी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

2 ऑगस्टला अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार : राजीव साबळे

राजीव साबळे आणि माणगाव नगरपंचायतीच्या नगरसेवकांना पैशाचे आमिष दाखवून खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषदेत एका पत्राद्वारे केला होता. यावर प्रतिक्रिया देताना राजीव साबळे यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले असून, सध्या कोणतीही निवडणूक नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या आरोपांना काही अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर 2 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षात अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती राजीव साबळे यांनी दिली आहे. या प्रवेशप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

दरम्यान, माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांनी देखील शिंदे सेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केलेल्या आरोपांचे खंडण केलं आहे. कोणी कितीही वल्गना केल्या तरी आम्ही आमच्या नेत्यासोबत राहणार असल्याचं एकमत माणगाव नगरपंचायतमधील नगरसेवकांनी केलं आहे. त्यामुळे रायगडमध्ये आता मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nitin Deshmukh : विधानसभा अध्यक्षच मॅनेज, आमदाराचा आरोप; महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्यांविरुद्ध लक्षवेधी मांडू देईना

Mahendra Thorve : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर रायगडमध्ये राजकीय भूकंप होणार? शिंदे गटाचे महेंद्र थोरवे ठाकरे गटाच्या वाटेवर?

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.