अनेकदा आपल्याला अशा काही गोष्टी सापडतात, ज्याची कधी आपण कल्पनाही केली नसेल. जर तुम्हाला अशा ठिकाणी एखादी खास वस्तू सापडली जिथे तुम्ही कल्पनाही केलेली नसेल, तर तुम्ही पळत जाऊन त्या वस्तुला उचलून घेता. जर तुम्हाला रस्त्यावर एखादी सुंदर वस्तू सापडली किंवा एखाद्या दुर्गम डोंगरावर किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर सुंदर गिफ्ट बॉक्स सापडला तर? तर तुम्ही तो बॉक्स पळत जाऊन नक्कीच उचलण्याचा प्रयत्न करणार, कारण तेव्हा तुमच्यामध्ये एक प्रकारचं कुतुहल असतं, की त्या बॉक्समध्ये नेमकं काय असणार? हे पाहाण्याचं. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. मात्र जेव्हा त्या व्यक्तीनं हा बॉक्स उघडला तेव्हा मात्र त्याला प्रचंड धक्क बसला.
काय आहे नेमकं प्रकरण?
हा व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत फिरण्यासाठी बीचवर आला होता, तिथे फिरत असताना त्याची नजर एका सुंदर रहस्यमय बॉक्सवर पडली. त्याला वाटलं की हा बॉक्स इतका सुंदर आहे, तर आत नक्कीच काहीतरी मजेदार गोष्ट असणार. असाच एक बॉक्स त्याला फादर्स डे ला गिफ्ट म्हणून त्याच्या मुलांकडून देखील मिळाला होता, त्यामुळे त्याला वाटले या बॉक्समध्ये देखील गिफ्ट असावं, कोणी तरी हा बॉक्स इथे विसरलं असावं. त्यामुळे तो स्वत:ला रोखू शकला नाही. तो पळतच त्या बॉक्सजवळ गेला. मात्र बॉक्स उघडताच त्याला प्रचंड धक्क बसला, तो हादरला, त्याला घाम फुटला. त्यानंतर त्याने तो बॉक्स तिथेच टाकला आणि तो पळत सुटला. या बॉक्समध्ये त्याला धक्कादायक गोष्ट दिसली होती.
नेमकं काय होतं त्या बॉक्समध्ये?
हा बॉक्स वरून फुलांनी छान समजवलेला होता, मात्र हा बॉक्स जेव्हा त्या व्यक्तीनं उघडला तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण या बॉक्समध्ये एका व्यक्तीच्या पायाचा कापलेला अंगठा आणि एक मृत पक्षी होता. बॉक्समधील ते दृश्य पाहून या व्यक्तीचा थरकाप उडाला. त्याने तो बॉक्स तिथेच फेकला आणि याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले, तो बॉक्स पाहून पोलीस देखील हादरले, पोलिसांनाही धक्का बसला. प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनीकडून देण्यात आली आहे. ही घटना न्यूयॉर्कमध्ये घडली असून, हा अंगठा नेमका कोणाचा? तो बॉक्स तिथे कसा आला? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.