China vs Taiwan : चीनच्या शेजारी अमेरिकेची फायटर जेट्स दाखल, युद्धाच्या तयारीत असलेल्या ड्रॅगनला मोठा झटका
GH News July 15, 2025 11:06 AM

तैवानशी युद्धाची तयारी करत असलेल्या चीनला मोठा झटका बसला आहे. अमेरिकेने चीनच्या शेजारी देशात आपले फायटर जेट्स तैनात केले आहेत. F-15EX ही फायटर विमानं जपानच्या ओकिनावा येथील ओकिनावा एअरबेसवर दाखल झाली आहेत. या क्षेत्रातील चीनच्या वाढत्या दबदब्याला आव्हान देण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलल्याच बोललं जातय. कडेना येथे आम्ही फक्त एकजुटता आणि ट्रेनिंगसाठी पोहोचलो आहोत असं अमेरिकन एअर फोर्सच्या 18 व्या विंगकडून सांगण्यात आलय.

चीन तैवान विरोधात लष्करी आक्रमकता दाखवत असताना अमेरिकेने हे पाऊल उचललं आहे. त्याशिवाय पश्चिम प्रशांत सागरात ड्रॅगनच्या सैन्य हालचाली सतत वाढत आहेत. चीन आमच्यावर हल्ल्याची तयारी करतोय अशी शंका तैवानने सुद्धा बोलून दाखवलीय. सद्य स्थितीत अमेरिकन फायटर जेट्सच जपानमध्ये दाखल होणं हे चीनचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे.

हा बेस अमेरिकेच कमांड सेंटरही बनू शकतो

जपानच्या ओकिनावा बेटावर दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर कडेना एअरबेस आहे. हा बेस रणनितीक दृष्टीने अमेरिकेसाठी शक्ती स्थळ मानला जातो. युद्धाच्या स्थितीत चीनच्या हालचालींवर नजर ठेवणं तसच कंट्रोल करण्यासाठी अमेरिकेच कमांड सेंटरही बनू शकतो. सर्वात खास बाब म्हणजे हा एअरबेस तैवानच्या खूप जवळ आहे. त्यामुळे कडेनाच रणनितीक महत्त्व वाढतं.

किती विमानं तैनात होणार?

अमेरिकेची 48 F-15C/D फायटर जेट्स कडेना एअरबेसवर तैनात आहेत. अमेरिकेची योजना आहे की, ही विमानं हटवून त्या जागी 36 नवीन F-15EX फायटर जेट्स तैनात करायची. F-15C/D फायटर जेट्सच्या तुलनेत F-15EX मधून जास्तीत जास्त हवेतून हवेत मारा करणारी मिसाइल्स वाहून नेता येऊ शकतात. ही विमानं हायटेक एवियोनिक्स आणि शस्त्रास्त्र प्रणालीने सज्ज आहेत. अमेरिकन एअरफोर्सच्या 18 व्या विंगनुसार सध्या ही जेट्स प्रशिक्षणासाठी आली आहेत. 2026 मध्ये कायमस्वरुपी तैनाती करण्याआधी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन तयार करणं हा त्यामागे उद्देश आहे.

अमेरिकन मिशनचा उद्देश काय?

जपानच्या विमान स्पॉटर द्वारा शेअर केलेले फोटो आणि मीडिया रिपोर्टनुसार शनिवार कडेना एअरबेसवर अमेरिकेची चार फायटर विमानं दाखल झाली. यात F-15EX, 1 F-15E, F-16C विमान आहेत. फ्लोरिडाच्या एग्लिन एअरफोर्स बेसवरुन ही विमानं पाठवण्यात आली आहेत. “या क्षेत्रात हवाई शक्तीच संतुलन साधण्यासाठी आम्ही या विमानांची तैनाती करत आहोत” असं 18 व्या विंगचे कमांडर ब्रिगेडियर जनरल निकोलस इवांस यांनी सांगितलं. क्षेत्रीय आक्रमकता रोखणं आणि सहकाऱ्यांना दिलासा देणं हा अमेरिकन मिशनच उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. गरज पडल्यास अमेरिका जपानचा सुद्धा रक्षण करेल, असं इवांस म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.