Tesla Showroom in Mumbai: जगातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रीक व्हिकल कंपनी टेस्लाने भारतात पाऊल ठेवले आहे. टेस्लाने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स (बीकेसी) मध्ये देशातील पहिले शोरुम उघडले आहे. भारतीय ईव्ही मार्केटमध्ये ही कंपनीची दमदार एन्ट्री आहे. टेस्ला Model Yची किंमत, फीचर्स सर्व काही जाणून घेऊ या.
भारतात टेस्लाची सुरुवात Model Y SUV पासून होत आहे. त्याच्या Model Y Rear-Wheel Drive ची किंमत जवळपास ६० लाख रुपये आहे. तसेच दुसरे व्हेरिएंट Long Range Rear-Wheel Drive ची किंमत ६८ लाख रुपये आहे. या कार टेस्लाच्या शंघाई येथील कंपनीतून भारतात आणल्या जात आहे. कंपनीने ८.३ कोटी रुपयांची एक्सेसरीज, सुपरचार्जर आणि इक्विपमेंटसुद्धा चीन आणि अमेरिकेतून भारतात आयात केले आहेत. हे सुपरचार्जर मुंबईच्या जवळपासच्या भागात लावण्यात येणार आहे. ज्यामुळे ग्राहकांची सुविधा होणार आहे.
टेस्लाचे सर्वात प्रसिद्ध Model Y SUV भारतात शंघाईमधून आयात केले जात आहे. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लागले आहे. प्रत्येक कारवर जवळपास २१ लाख रुपयांपेक्षा जास्त कर द्यावा लागत आहे. भारतात ही कार तयार झाली असती तर तिची किंमत ४० हजार डॉलरपेक्षाही (जवळपास ३५ लाख) कमी असती. कारण त्यावर सरळ ७० टक्के कर लागला असता. परंतु दुसऱ्या देशातून आयात केली जात असल्याने ही कार भारतात महाग आहे.
भारतात टेस्लाची एंट्री सामान्य नाही. भारतात टेस्लाला चीनच्या बीवायडीसारख्या कंपन्यांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. बीवायडी भारतीय बाजारात आधीपासून आहे. आता टेस्लाला आपले स्थान निर्माण करावे लागणार आहे.