वॉक केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायला हवे,अनेक लोकांना माहिती नाही
GH News July 16, 2025 12:06 AM

मॉर्निंग वॉक वा कोणतीही एक्सरसाईज केल्यानंतर अनेक लोकांना लागलीच तहान लागते. त्यावेळी अनेक लोक लागलीच कोणताही विचार न करता पाणी घटाघट पित असतात. परंतू तुम्हाला माहिती आहे का ? वॉक केल्यानंतर लागलीच पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे की नाही ? बहुतांशी वेळा यापासून अनेक लोक अनभिज्ञ असतात. चालून झाल्यानंतर पाणी प्यायची एक वेळ आणि पद्धत असते.

वॉकींग झाल्यानंतर लागलीच पाणी प्यावे ?

जेव्हा आपण वॉक किंवा कोणताही व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीराचे तापमान वाढते आणि आपल्याला गरम होऊन घाम येऊ लागतो. अशा वेळी आपले ब्लडप्रेशर वाढलेले असते आणि शरीरास सामान्य तापमानास यायला थोडा वेळ लागतो. जर तुम्ही लागलीच पाणी प्यायला तर अनेक अडचणी येऊ शकतात. चला तर वाचूयात काय नेमक्या अडचणी येतात.

सर्दी किंवा खोकला येऊ शकतो : जर शरीराचे तापमान वाढलेले असेल आणि तुम्ही पाणी प्याला तर अचानक शरीर थंड होऊन सर्दी खोकला होऊ शकतो.

पोटात दुखु शकते : तहान प्रचंड लागली असताना अचानक पाणी प्यायल्याने पोटात दुखू शकते किंवा चमक मारु शकते.

पचनावर परिणाम होतो : लागलीच पाणी प्यायल्याने पचन प्रक्रीया रोखू शकते. त्यामुळे अपचन होऊ शकते.

वॉक केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे ?

तज्ज्ञांच्या माहीतीनुसार चालणे थांबवल्यानंतर किमान २० ते ३० मिनिटांनी पाणी प्यायला हवे. या दरम्यान, तुम्ही काही वेळ बसून हलके स्ट्रेचिंग करुन तुमच्या शरीराला कूल डाऊन करु शकता. जेव्हा तुमचा पल्स रेट नॉर्मल होईल तेव्हा घाम येणे बंद होईल.तेव्हा तुम्ही पाणी पिणे योग्य होईल.

फॉलो करा या टिप्स –

हळूहळू प्या : एक साथ जास्त पाणी पिण्याऐवजी हळू हळू एक – एक घोट पाणी प्या

रूम टेंपरेचर पाणी : थंड पाणी पिऊ नये, हलके कोमट पाणी पिणे केव्हाही चांगले

हायड्रेटेड रहा: केवळ चालतानाच नव्हे तर संपूर्ण दिवसभर योग्य प्रमाणात पाणी प्या, बॉडी डायड्रेटेड ठेवा. खुपच घाम येत असेल तर साध्या पाण्या ऐवजी नारळ वा लिंबू पाणी पिऊ शकता.

योग्य वेळी आणि पद्धतीने पाणी प्यायल्याने बॉडी रिकव्हर होण्यास मदत होते. आणि आरोग्याचे लाभ मिळतात. तेव्हा यापुढे वॉक करताना कधीही तहान लागली तर थोडे थांबन रिलॅक्स झाल्यानंतर सावकाश पाणी प्या…

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.