सोन्याचा चमचा, भरलेलं ताट, ठाकरे-शिंदेंची जुगलबंदी; प्रवीण दरेकरांची DCM शिंदेंसाठी बॅटिंग
Marathi July 16, 2025 08:25 PM

मुंबई : राज्याच्या विधानपरिषद सभागृहात विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबडास डॅनवे यांच्या निरोप समारंभाचे भाषण होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्यानंतर शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अंबादास दानवेंमधील कार्यकर्त्याचा गुण सांगितला. मात्र, या भाषणांवेळी शिंदे आणि ठाकरेंमधील जुगलबंदी पाहायला मिळाली. एकेनाथ शिंडेनी (एकनाथ शिंदे) भाषण करताना नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला मारला. अंबादास हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नव्हता, सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून त्याचं नेतृत्व घडल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचलं. त्यावर, उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) शिंदेंना टोला लगावला. त्यानंतर, एकनाथ शिंदेंसाठी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी बॅटिंग केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसल्याचं वक्तव्य केलं. शिंदेंच्या याच वक्तव्याचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनीही जोरदार टोलेबाजी केली. मला वाटलं उद्धव ठाकरे अंबादास दानवे यांच्यावर बोलतील, परंतु त्यांनी टोमणे मारणे सोडलं नाही. त्यांनी भरल्या ताटाचा उल्लेख केला, पण आता ते ताट कोणी लाथाडलं. आपण एकाकडे बोट दाखवत असाल तर बाकी बोटं आपल्याकडे असतात हे लक्षात घ्यावं, असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी एकनाथ शिंदेंसाठी बॅटिंग केली. उद्धव ठाकरे तुम्ही संघाचे आभार मानले, आम्ही देखील तुमचे आभार मानतो. कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत वाढलेले कार्यकर्ते आम्हाला दिले. उद्धव ठाकरे तुम्ही अंबादास दानवे यांनी एका मुलीला शिक्षणासाठी पैसे दिल्याचा उल्लेख केला. परंतु, एकनाथ शिंदे दररोज अशा 100 लोकांना मदत करतात, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला. दरम्यान, अंबादास दानवेंना खासदारकी द्यायची वेळ आली तेव्हा त्यांचा प्रवास वेगळा झाला असता, त्यांना खासदार बनता आलं असतं. पण, विरोधी पक्षनेता ते झाले नसते, असे म्हणत दरेकरांनी अंबादास दानवेंची खासदारकीची संधी हुकल्याचे म्हटले.

… तर संजय राऊत खासदार झालेच नसते

एकनाथ शिंदे तुम्ही संजय राऊत आणि अंबादास दानवे यांचा टांगा पलटी करू शकले असते, मग ना संजय राऊत खासदार झाले असते ना अंबादास दानवे आमदार बनले असते. मात्र, तुम्ही प्रतारणा केली नाही, तुम्ही सांगितलं की आपण असं करायचं नाही म्हणून हे दोघे निवडून आले. तुम्ही लक्षात ठेवा एकनाथ शिंदे तर तुमच्या पाठीशी आहेतच. परंतु, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील तुमच्या पाठीशी आहेत, उद्धव ठाकरे यांचा काही विषय येत नाही असे म्हणत एकप्रकारे अंबादास दानवेंना प्रवीण दरेकरांनी ऑफरच दिली आहे.

हेही वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.