पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा मंगळवारी (16 जुलै ) राजीनामा दिल्यानंतर आता आमदार रोहित पवारांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी देण्यात आलीय . रोहित पवार यांची पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी x माध्यमावर पोस्ट करून याबाबत घोषणा केली आहे . नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय . रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल याची खात्री असल्याचे म्हणत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात .
गेल्या 25 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या जयंत पाटील यांनी मंगळवारी अखेर आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला .त्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली . जयंत पाटील पायउतार होताच आता आमदार रोहित पवारांना पक्षात मोठी जबाबदारी मिळाली आहे .राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी x पोस्टवर घोषणा करत रोहित पवारांची पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याचं सांगितलं .
‘नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली. रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल याची खात्री आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारांचा वस्तुपाठ डोळ्यांसमोर ठेवून ते काम करीत आहेत. नूतन प्रांताध्यक्ष शशिकांत जी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची शिव फुले शाहू आंबेडकर ही वैचारिक चौकट अधिक भक्कम करण्यासाठी ते सदैव कार्यरत राहतील हा विश्वास आहे. त्यांचे या नवीन जबाबदारीबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. ‘ अशी पोस्ट खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय .
हेही वाचा:
https://www.youtube.com/watch?v=NV_5KODBDB8
आणखी वाचा