आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा अष्टपैलू वेंकटेश अय्यर पूर्णपणे फेल गेला. फ्रेंचायझीने त्याला आयपीएल मेगा लिलावात 23.75 कोटी खर्च करून घेतल होतं. पण त्याने या किमतीला साजेशी कामगिरी केली नाही. संपूर्ण पर्वात त्याची बॅट काही खास चालली नाही. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स त्याल रिलीज करण्याचा तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तसेच इतर फ्रेंचायझींचं पण त्याच्याकडे लक्ष आहे. ट्रेड विंडोच्या माध्यमातून त्याच्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. पुढच्या पर्वात वेंकटेश अय्यर दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. पण याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचा विकेटकीपर फलंदाज इशान किशनबाबतही अशीच माहिती समोर येत आहे.
वेंकटेश अय्यर 2021 पासून कोलकाता नाईट रायझर्स संघाचा भाग आहे. आता काव्या मारनचा सनरायझर्स हैदराबाद संघ त्याला आपल्याकडे खेचण्यात रस दाखवत आहे. कारण इशान किशनने मागच्या पर्वात काही खास कामगिरी केली नाही. त्यामुळे वेंकटेश अय्यरची त्याच्या जागी वर्णी लागू शकते. आता ट्रेड विंडोच्या माध्यमातून हे दोन खेळाडूंची अदलाबदल होणार की आणखी काही वेगळं समीकरण असेल याबाबत काहीच स्पष्टता नाही. इशान किशनला रिलीज केलं जाईल याबाबत काहीच माहिती नाही. इशान किशनसाठी कोणती फ्रेंचायझी बोली लावणार याबाबतही क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा आहे.
वेंकटेश अय्यरने मागच्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी एकूण 11 सामने खेळले होते. त्यातील 7 डावात त्याने 20.28 च्या सरासरीने 142 धावा केल्या. यात एका अर्धशतकाचा समावेश होता. यावेळी त्याचा स्ट्राईक रेटहा 139.21 इतका होता. पण या पर्वात त्याने गोलंदाजी केली नाही. पण 2024 आयपीएल स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती. तसेच संघाच्या जेतेपदासाठी मोलाची भूमिका बजावली होती. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने 11.5 कोटी खर्च करून इशान किशनला संघात घेतल होतं. पण त्याने 14 सामन्यातील 13 डावात 35.40 च्या सरासरीने 354 धावा केल्या. यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे.