IND vs ENG: ‘मालिकेत बरोबरी करायची असेल', तर मोहम्मद कैफने टीम इंडियाला दिला विजयाचा सल्ला
Marathi July 18, 2025 09:25 PM

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohmmed Kaif) यांनी इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. त्यांनी म्हटलं की, वरिष्ठ खेळाडू नसतानाही युवा संघाने जबरदस्त कामगिरी केली.

ते म्हणाले, पराभवानंतर घाबरून निर्णय घेणं टाळा असा सल्ला देखील त्यांनी संघ व्यवस्थापनाला दिला. करुण नायरसारख्या (Karun Nair) खेळाडूंवर विश्वास ठेवायला हवा आणि निवडीत सातत्य असायला हवं.

शुबमन गिलचं (Shubman gill) नेतृत्व आणि फलंदाजी दोन्ही प्रशंसनीय असल्याचं कैफ म्हणाले. जडेजाने शानदार खेळी केली, रिषभ पंतंच्या अनुपस्थितीबद्दलही त्यांनी भाष्य केले. भारताची फिल्डिंग चांगली होती, पण काही क्षण निर्णायक ठरले.

कैफने म्हटलं की, इंग्लंडचं सध्याचं गोलंदाजी आक्रमण कमकुवत आहे, तरीही भारताने 193 धावांचा पाठलाग केला नाही, हे खंतजनक आहे. शुबमन गिलने आतापर्यंत टॉस गमावले, पण पुढे कोहलीप्रमाणे टॉस जिंकल्यावर नेहमी फलंदाजीच घ्यावी, असंही त्यांनी सुचवलं. गिलमध्ये एक प्रभावी खेळाडू होण्याची क्षमता आहे, आणि हे अनुभव त्याला शिकवतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.