पीएम किसानच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा वाढली, 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार?
Marathi July 18, 2025 09:25 PM

पंतप्रधान किसन सम्मन निधी नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांचं लक्ष पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 2000 कधी मिळणार याकडे लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून 18 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील अशा चर्चा होत्या. मात्र, आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जमा झालेले नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्यासंदर्भात आणखी वाट पाहावी लागेल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षात 6  हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 19 हप्त्यांचे 2000 रुपयांप्रमाणं पैसे देण्यात आले आहेत. आता पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळते याकडे शेतकऱ्याचंं लक्ष लागलं आहे. पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी 2025 रोजी देण्यात आले होते. ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बिहार मधील एका कार्यक्रमातून वितरित करण्यात आली होती. त्यापूर्वीच्या 18 व्या हप्त्याची रक्कम महाराष्ट्रC. वाशिम जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करुन देण्यात आली होती.

शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याचे 2000 कधी मिळणार?

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण साधारणपणे चार महिन्यांच्या कालावधीनंतर केलं जातं. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं. त्याला आता चार महिने पूर्ण झाले आहेत. आता शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारनं फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु करण्यात आली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. आता खरिप हंगामाच्या निमित्तानं 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

पीएम किसान सन्मा निधीच्या 20 व्या हप्त्याची रक्कम मिळावी म्हणून योजनेतील पात्र शेतकऱ्यांना देखील काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल. त्या गोष्टींची पूर्तता केल्यास शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची रक्कम मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. बँक खातं आधार लिंक असावं. बँक खात्याच्या माहितीची पडताळणी केलेली असावी. शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणं आवश्यक आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर जाऊन बेनिफिशिअरी स्टेटसची तपासणी करावी. याशिवाय ओटीपी आणि नोटिफिकेशनसाठी मोबाईल क्रमांक अपडेट करावा.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.