ENG vs IND : इंग्लंड-इंडिया वूमन्स आमनेसामने, लॉर्ड्समध्ये महामुकाबला, किती वाजता सुरुवात होणार?
GH News July 19, 2025 12:10 AM

वूमन्स इंडिया क्रिकेट टीमने आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताने इंग्लंडचा 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत धुव्वा उडवला. भारताने ही मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. भारताची इंग्लंडमध्ये टी 20I मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यानंतर भारताने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही विजयी सलामी दिली. भारताने 16 जुलैला झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 4 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडिया या विजयानंतर दुसऱ्या सामन्यासाठी तयार आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा एकदिवसीय सामना केव्हा?

इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा एकदिवसीय सामना शनिवारी 19 जुलैला खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा एकदिवसीय सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा एकदिवसीय सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध भारत दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा एकदिवसीय सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध भारत दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.

खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर?

लॉर्ड्समधील खेळपट्टीतून फलंदाजांना मदत मिळते. तसेच लॉर्ड्समधील पीच स्पिनरसाठीही पोषक आहे. तसेच रात्री दव पडण्याची शक्यता असल्याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय फायदेशीर ठरु शकतो.

दोन्ही संघांकडून जोरदार सराव

दरम्यान इंग्लंड आणि टीम इंडिया या दोन्ही संघांनी दुसर्‍या सामन्याआधी नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे. आता दुसऱ्या सामन्यात कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

इंग्लंडकडून लॉर्ड्समध्ये सराव

भारताने असा जिंकला पहिला सामना

भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 50 ओव्हरमध्ये 6 झटके देत 258 धावांवर यशस्वीपणे रोखलं. त्यानंतर टीम इंडियाने हे आव्हान 48.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. भारताच्या विजयात दीप्ती शर्मा हीने प्रमुख भूमिका बजावली. दीप्तीने सर्वाधिक आणि नाबाद 62 धावा केल्या. ओपनर प्रतिका रावल हीने 36 धावा जोडल्या. तर इतरांनीही आपली भूमिका चोखपणे पार पाडत भारताच्या विजयात योगदान दिलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.