ENG vs IND : चौथ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, त्या तिघांना संधी नाहीच
GH News July 22, 2025 12:10 AM

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आता अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. उभयसंघातील हा सामना 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतासमोर मालिकेत कायम राहण्यासाठी मँचेस्टरमध्ये होणाऱ्या सामन्यात विजयी होण्याचं आव्हान आहे. तर इंग्लंड हा सामना जिंकून मालिका नावावर करण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडने त्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे. इंग्लंडने चौथ्या सामन्यासाठी सोमवारी 21 जुलैला प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

बेन स्टोक्स हा इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. चौथ्या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. दुखापतीमुळे इंग्लंडचा फिरकी गोलंदाज शोएब बशीर याला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे त्याच्या जागी लियाम डॉसन याचा इंग्लंड संघात समावेश केला गेला. त्यानंतर आता लियाम डॉसन याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

इंग्लंडने 15 जुलैला चौथ्या सामन्यासाठी 14 सदस्यीय संघ जाहीर केला. लियामचा या संघात समावेश करण्यात आला. तेव्हापासूनच लियामची निवड होणार असल्याचं निश्चित समजलं जात होतं. तर आता त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाला आहे. तर गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल आणि जोश टंग या तिघांना तिसऱ्यानतंर चौथ्या सामन्यातही प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप , जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, लियाम डॉसन, क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स आणि जोफ्रा आर्चर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.