युद्धखोरीमुळे अमेरिकेसह संपूर्ण जग इस्रायलची निंदा करतय. मात्र, इस्रायल या सगळ्या टीकेकडे दुर्लक्ष करुन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. इस्रायलने एकाचवेळी अनेक आघाड्या उघडल्या आहेत. मागच्याच महिन्यात इस्रायलने इराण विरुद्ध युद्ध पुकारलं होतं. हे युद्ध संपल्यानंतर इस्रायलकडून गाजा,लेबनान आणि सारियावर हल्ले करण्यात आले. मागच्या दोन वर्षांपासून इस्रायल वेगवेगळ्या शत्रुंविरुद्ध युद्धच लढत आहे. इस्रायलने आता आणखी एका देशावर हल्ला केला आहे. इस्रायलला इराणनंतर दुसरा धोका हूतींकडून आहे. रेड सी मध्ये हुतींमुळे इस्रायलच एलिट पोर्ट जवळ-जवळ ठप्प झालं आहे. आता इस्रायल अमेरिकेच्या मदतीशिवाय हुतींवर हल्ले करत आहे.
इस्रायली एअर फोर्सने येमेनमध्ये हवाई हल्ल्यांची मालिका सुरु केली आहे, इस्रायली मीडियाने सोमवारी ही माहिती दिली. इस्रायलने येमेनमधील होदेइदाह क्षेत्रासह पश्चिम किनाऱ्याला टार्गेट केलं. यावेळच्या हल्ल्याची नवीन गोष्ट म्हणजे इस्रायलने कुठल्याही इशाऱ्याशिवाय हे हल्ले केले. इस्रायलचा येमेनवरील हा 12 वा हल्ला आहे. हुती बंडखोरांनी गाजामध्ये हमासच समर्थन केलय. त्यावरुन या सगळ्या वादाला सुरुवात झाली. हमासच्या समर्थनार्थ हुती बंडखोरांनी रेड सी मध्ये इस्रायल-अमेरिकेशी संबंधित जहाजांवर हल्ले केले. इस्रायलला हिजबुल्लाह प्रमाणे हुती बंडखोरांपासून असणारा धोका मूळापासून संपवायचा आहे.
इस्रायली फायटर जेट्सनी घ्यावी लागली माघार
येमेनच्या एअर डिफेन्स सिस्टिमने इस्रायली हल्ले रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना कितपत यश मिळालं, त्या बद्दल ठोस माहिती नाहीय. 7 जुलैला इस्रायली एअर फोर्सने येमेनच्या होदेइदाह, सालिफ आणि रास ईसा येथे प्रमुख बंदरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. इस्रायलचा मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न हुती बंडखोरांनी उधळून लावला होता.
लेबनानी न्यूज अल मायादीनशी बोलणाऱ्या सैन्य सूत्राने सांगितलं की, येमेनी सैन्याने जमिनीवरुन हवेत मारा करणारी मिसाइल्स डागली. त्यामुळे इस्रायली फायटर जेट्सच्या पहिल्या ताफ्याच्या मार्गात अडथळे आले. परिणामी इस्रायलच्या 10 फायटर जेट्सना मिशन पूर्ण करण्याआधीच येमेनच्या हवाई क्षेत्रातून माघार घ्यावी लागली होती.