गेल्या काही वर्षात हार्ट अटॅकचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. ही स्थिती केवळ भारतातच नाही तर जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरात हार्ट अटॅकमुळे मृत्यु होण्याचे प्रमाण अधिक आहे. केवळ वयोवृद्धच नव्हे तर तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याची गंभीर समस्या उद्भभवत आहे. हार्ट अटॅक येण्याला अनेकदा अनुवांशिक तर काही वेळा बदललेली जीवनशैली कारणीभूत ठरत आहे. पण, नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार, सोमवारीच सर्वाधिक हार्ट अटॅक येत असल्याचे सांगण्यात आले आहे. ब्रिटिश हार्ट फाउंडेशन (BHF) च्या रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आले आहे. पण, यामागची कारणे काय आहेत जाणून घेऊयात लेखातून
जैविक घड्याळ –
शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असतात. त्यामुळे आपला मेंदू विश्रांतीच्या स्थितीत असतो. तसेच सुट्टी असल्याने उशिरा झोपतो आणि उशिरा उठतोही. यामुळे शरीराचा circadian rhythm जैविक घड्याळ बदलते. पुन्हा सोमवारी कामाचा दिवस सुरू होतो आणि ताणतणावामुळे शरीरातून जास्त प्रमाणात स्ट्रेस हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो, असे तज्ज्ञमंडळी सांगतात.
मद्याचे सेवन –
शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने बहुतेकजण दारुपार्टी करतात. ज्यामुळे रक्तात फॅट्सचे प्रमाण वाढते. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
अनहेल्दी खाणं-पिणं –
शनिवार आणि रविवारी वीकेन्ड असल्याने अनहेल्दी खाणं होतं. अनहेल्दी खाण्यात गोड, खारट आणि प्रोसेस्ड फूडचा समावेश असतो. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि नसा ब्लॉक होतात. परिणामी, हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
धावपळ –
दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सर्वचजण कामावर निघतात. त्यामुळे ट्रॅफिक, प्रदुषण यामुळे शरीरासह मनाचा थकवा वाढतो. ज्याचा परिणाम एकूण आरोग्यावर होतो. परिणामी, हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
हेही पाहा –