येमेनच्या तुरुंगात बंद असलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. निमिषा सेव्ह इंटरनॅशनल काऊन्सिलच्या लोकांमध्ये आपसातच वाद सुरु झालेत. देणगी आणि पैसा जमा करण्यावरुन परिषदेमध्येच वाद आहेत. तलाल अब्दो महदीच्या परिवाराने परिषदेचा सदस्य सॅम्युअलवर पैसे खाण्याचा आरोप केला आहे. ‘द हिंदू’नुसार तलाल अब्दोच्या भावाने फेसबुकवर पोस्ट लिहून सॅम्युअलवर ब्लड मनीसाठी 35 लाख रुपये बनावट पद्धतीने जमवल्याचा आरोप केला आहे. या पैशांबद्दल निमिषाच्या कुटुंबाला कधी सांगण्यात आलं नाही. सॅम्युअल निमिषाला वाचवणाऱ्या परिषदेचा मुख्य सदस्य आहे. तो येमेनची राजधानी सनामध्ये राहतो.
तलालच्या भावाने जसे सॅम्युअलवर पैसा खाण्याचा आरोप केला, तशी निमिषा इंटरनॅशनल काऊन्सिल हरकतीत आली. परिषदेच्या कायदेशीर सल्लागारानुसार सॅम्युअलला तात्काळ परिषदेवरुन हटवण्यात आलं आहे. सॅम्युअलवर दूतावासाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने पैसे स्वीकारल्याचा आरोप आहे.
ठोस पुरावे असल्याचा दावा
सॅम्युअल आतापर्यंत पीडित अब्दो कुटुंबासोबत चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावत होता. सॅम्युअल सध्या येमेनमध्येच आहे. अब्दो कुटुंबानुसार त्याने ब्लड मनीच्या नावाखाली दलाली केली आहे, याचे त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत. सॅम्युअल तामिळ वंशाचा आहे. तो येमेनमध्येच राहतो. निमिषा तुरुंगात गेल्यानंतर तो केसमध्ये एक्टिव झाला. अनेकवेळा त्याने निमिषाची तुरुंगात भेट घेतली. निमिषाच्या केसमध्ये तोच सर्वात पुढे होता.
सॅम्युअलने काय स्पष्टीकरण दिलय?
सॅम्युअलने त्याच्यावर झालेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना म्हणाला की, “हे सर्व आरोपी ग्रँड मुफ्तीच्या एन्ट्रीनंतर सुरु झाले. अबूबकर यांना भारतातराहूनच हा विषय हँडल करायचा आहे. त्यामुळे केसची स्थिती अजून कमजोर झाली आहे” सॅम्युअलनुसार ग्राऊंडवर कुठलीही Action दिसत नाहीय. त्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं आहे. सॅम्युअल आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमधील वाद यामुळे निमिषा प्रियाच्या अडचणी आणखी वाढू शकतात. फक्त ब्लड मनीच आता निमिषा प्रियाचे प्राण वाचवू शकते. सॅम्युअलवरुन तलालच्या कुटुंबाने ज्या प्रकारे निशाणा साधलाय, त्यामुळे पुढचा मार्ग कठीण वाटतोय.
निमिषा येमेनमध्ये कधी गेलेली?
निमिषा प्रिया केरळच्या पलक्कड जिल्ह्याची निवासी आहे. तिचं वय 38 वर्ष असून ती पेशाने नर्स आहे. निमिषा 2011 साली येमेनमध्ये गेली होती. ती कामासाठी आपल्या कुटुंबासोबत गेली होती. या दरम्यान येमेनमध्ये अशांतता निर्माण झाली. त्यामुळे तिचा पती आणि मुलगी दोघे भारतात परतले. ते तीन वर्ष येमेनमध्ये राहिले. 2014 साली ते भारतात निघून आले. निमिषाने कुटुंबाच्या पालनपोषणासाठी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.