त्यांच्या कामाचा झपाटा, उरक पाहून…पवारांनी केले फडणवीसांचे तोंडभरून कौतुक!
GH News July 22, 2025 08:14 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वयाची 55 वर्षे पूर्ण केली असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे खासदार शरद पवार यांनीही शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. फडणवीस यांच्या कामाचा वेग आफाट आहे असे म्हणत फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो, अशी स्तुतीसुमनं शरद पवारांनी फडणवीस यांच्यावर उधळली आहे.

देवेंद्र फडणवीस थकत कसे नाहीत?

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र नायक’ पुस्तकात वेगवेगळ्या नेत्यांनी फडणवीस यांच्या कार्याबद्दल मतं व्यक्त केली आहेत. तसेच फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. याच पुस्तकात शरद पवार यांनीदेखील फडणवीस यांच्याविषयी मत व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट आहे. फडणवीसांचे कष्ट पाहून, ते थकत कसे नाहीत? असा प्रश्न पडतो, अशा शब्दांत शरद पवारांकडून फडणवीसांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय.

शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलंय?

देवेंद्र फडणीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो. देवेंद्र फडीसांचीदेखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धींगत होत राहो, असे फडणवीसांचे अभिष्टचिंत शरद पवार यांनी केले.

बुद्धीचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानादेखील

तसेच, देवेंद्र फडणीस हे कायद्याचे पदवीधर असल्याचे पट्टीचे हजरजबाबी, संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धीचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानादेखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी होती, अशी स्तुतीसुमनंही शरद पवार यांनी फडणीसांवर उधळली.

फडणवीसांना केंद्रात जबाबदारी मिळण्याची शक्यता- उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. भविष्यात फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, अशी शक्यताही ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच फडणवीस हे एक प्रामाणिक व हुशार राजकारणी आहेत, असेही ठाकरेंनी म्हटलंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.